महाराजांची जगदंबा तलवार लवकरच महाराष्ट्रात आणणार, सांस्कृतिक मंत्र्यांची घोषणा

263

महाराष्ट्र आणि देशाच्या दृष्टीने आनंदाची वार्ता समोर येत आहे. ब्रिटनमधील छत्रपती शिवाजी महाराजांची सुप्रसिद्ध अशी जगदंबा तलवार महाराष्ट्रात परत आणणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी केली आहे. 2024 पर्यंत महाराजांची ही जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशाच्या दृष्टीने ही एक अभिमानाची गोष्ट असल्याचे बोलले जात आहे.

मुनगंटीवार यांची माहिती

गेल्या अनेक वर्षांपासून ब्रिटनच्या वस्तू संग्रहालयातील जगदंबा तलवार ही भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पण ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची निवड झाल्यानंतर राज्य सरकारकडून केंद्र सरकारला ही तलवार परत आणण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असून त्यासाठी पाठपुरावा देखील करण्यात येणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

(हेही वाचाः साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! साई संस्थानने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय)

350व्या शिवराज्याभिषेकाला जगदंबा तलवार आणणार

2024 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साधारणतः 350 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून एक आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामुळे ही तलवार जर 2024 ला महाराष्ट्रात आली तर ही फार मोठी आनंदाची गोष्ट असणार आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

शिवप्रतापदिनी प्रतापगडावरील औरंगजेबाच्या कबरीभोवती असलेले अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर आता महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने टाकण्यात आलेले हे दुसरे पाऊल असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.