Chhattisgarh Accident: कवार्धा येथे पिकअप वाहन उलटले, १४ महिलांसह १८ मजुरांचा जागीच मृत्यू

127
Chhattisgarh Accident: कवार्धा येथे पिकअप वाहन उलटले, १४ महिलांसह १८ मजुरांचा जागीच मृत्यू

छत्तीसगड (Chhattisgarh Accident) येथून एक वेदनादायक बातमी समोर आली आहे. छत्तीसगड जिल्ह्यातील कवार्धा (Kawardha) येथे भरधाव वेगातील पिकअप वाहन पलटले. या अपघातात १८ मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १४ महिलांचा समावेश आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पिकअप वाहन मजुरांना घेऊन जंगलातून भरधाव वेगाने परतत असताना हा अपघात झाला. यावेळी उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते पलटी झाले. त्यावेळी वाहनामध्ये २५ ते ३० जण होते. सर्व कामगार जंगलातून टेंभुर्णीची पाने उपटून परतत होते. (Chhattisgarh Accident)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: ओडिशात १० जूनला भाजपचे डबल इंजिन सरकार बनणार; PM Narendra Modi यांचा दावा )

कबीरधाम जिल्ह्यातील कुकडूर पोलीस स्टेशन हद्दीतील बहपनी गावाजवळ पिकअप उलटल्याने १८ गावकऱ्यांचा मृत्यू आणि ०७ जण जखमी झाल्याची दुःखद बातमी मिळत आहे. जखमींवर उत्तम उपचार व्हावेत यासाठी आवश्यक त्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री विष्णुदेव साई (CM Vishnudev Sai) यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून असे विधान केले. 

सरकार पीडितांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहे – उपमुख्यमंत्री शर्मा

उपमुख्यमंत्री विजय शर्मा (DCM Vijay Sharma) यांनी ‘कवार्धामध्ये मजुरांनी भरलेले पिकअप वाहन उलटल्याने १८ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्व कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी कामना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत पुरवण्यात गुंतले आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: ओडिशात १० जूनला भाजपचे डबल इंजिन सरकार बनणार; PM Narendra Modi यांचा दावा)

कवार्धाचे एसपी अभिषेक पल्लव (SP Abhishek Pallava) यांनी सांगितले की, कवार्धा परिसरात पिकअप वाहन उलटल्याने मोठा अपघात झाला. यात प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित वाहन कामगारांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. सर्व मजूर आपले काम उरकून परतत असताना हा अपघात घडला. असे विधान कवार्धाचे एसपी अभिषेक पल्लव यांनी केले. 

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.