मुंबई –
चिकन बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेलात गेलेल्या कुर्ल्यातील शेख कुटूंबियांना चिकन बिर्याणी चांगलीच महागात पडली. बिर्याणी खाताना शेख कुटूंबातील ३४ वर्षीय रेश्मा (काल्पनिक नाव) हिच्या घशात कोंबडीचे हाड अडकले, (Bone stuck in throat) आणि हे हाड शस्त्रक्रिया करून काढावे लागले. या शस्त्रक्रिये साठी शेख कुटूंबाला ४ लाखांचा खर्च आला असून या सर्व वैद्यकीय प्रकियेला १ महिण्याचा कालावधी लागला. (Chicken Biryani)
कुर्ला (Kurla) येथे राहणारे शेख कुटूंबियांनी ३ फेब्रुवारी रोजी हॉटेलात जेवणाचा बेत आखला होता, शेख कुटूंबातील ३४ वर्षीय रेश्मा (काल्पनिक नाव) तिचा पती, दोन मुले आणि सासुसासरे हे हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. सर्वांसाठी त्यांनी चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली, चिकन बिर्याणीचा आस्वाद घेत असताना अचानक रेश्माचा श्वास अडकला, तीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, आणि तीने डोळे फिरवले. रेश्माची हालत बघून शेख कुटूंब हादरले आणि त्यांनी हॉटेल (Hotel) कर्मचारी यांच्या मदतीने तात्काळ रेश्माला कुर्ल्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवले. हॉस्पिटच्या तपासणीत आढळून आले की, तिच्या घशात कोंबडीचे हाड अडकले आहे, अडकलेले कोंबडीचे हाड काढण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियापूर्वी वेगवेगळे उपाय करून बघितले. मात्र हाड अशा ठिकाणी अडकले होते की, शस्त्रक्रिया हा अखेरचा उपाय होता. या साठी रुग्णालयाने ८ लाख रुपयांचा खर्च सांगितला होता.
(हेही वाचा – संगमेश्वरमध्ये Chhatrapati Sambhaji Maharaj यांचे भव्य स्मारक उभारणार; अजित पवारांची मोठी घोषणा)
हेही पाहा –