BMC : महापालिकेच्या १२ आयुक्तांची सेवा करणारा ‘शिपाई’ सेवानिवृत्त

526
BMC : महापालिकेच्या १२ आयुक्तांची सेवा करणारा ‘शिपाई’ सेवानिवृत्त
BMC : महापालिकेच्या १२ आयुक्तांची सेवा करणारा ‘शिपाई’ सेवानिवृत्त

मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्तांच्या पहाऱ्यावरील मुख्य जमादार सुर्यकांत शिवराम घाणेकर हे १ नोव्हेंबर २०२३ रोजी सेवा निवृत्त झाले असून अत्यंत शांत आणि प्रामाणिक व्यक्तीमत्त्व म्हणून ओळख असलेल्या घाणेकर यांनी आयुक्तांच्या कार्यालयातच सलग २००७ पासून हविलदार, जमादार आणि आता मुख्य जमादार आदी पदांवर निवृत्तीपर्यंत सेवा बजावली आहे. अत्यंत कडक शिस्तीचे शरद काळेपासून ते सध्याचे इक्बालसिंह चहल आयुक्तांच्या पहाऱ्यावर त्यांनी काम केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती पुळे मालगुंडमधील सूर्यकांत घाणेकर हे १ ऑक्टोबर १९८५ रोजी महापालिकेत शिपाई पदावर सेवेत रुजू झाले. सुरुवातीला सामान्य प्रशासन विभागात कार्यरत असणाऱ्या घाणेकर यांना १९९२ रोजी नाईक पदा बढती मिळाली, आणि आयुक्तांच्या कार्यालयात बदली झाली. २००५ मध्ये त्यांना हविलदारपदी बढती मिळाली. त्यानंतर प्रमुख अभियंता (दक्षता) कार्यालयात त्यांची बदली झाली. पण दोन वर्षांनतर आयुक्तांच्या कार्यालयात पुन्हा बदली झाली आणि पुढे याच कार्यालयात मुख्य जमादार म्हणून ते सेवा निवृत्त झाले.

(हेही वाचा – National Games Kusti Team: महाराष्ट्र ऑलिम्पिक कुस्तीला सापत्न वागणूक देतेय?)

घाणेकर हे अत्यंत शांत स्वभावाचे आणि प्रामाणिक असल्याने प्रत्येक आयुक्तांचे ते लाडके बनले होते. सध्याचे आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांचाही त्यांच्यावर अधिक विश्वास होता. प्रत्येक कामात कार्यतत्परता आणि कोणालाही बोलण्याची संधी देता आपले काम चोखपणे पार पाडण्याचा त्यांचा हातखंडा असल्याने प्रत्येक आयुक्त त्यांच्या कामावर खुश असायचा. त्यामुळे आजवर शरद काळे यांच्या पासून ते प्रविणसिंह परदेशी, चहल यांच्यापर्यंत १२ आयुक्तांची सेवा त्यांनी चोख पार पाडली. त्यामुळेच सलग तब्बल १६ वर्षे जमादार व मुख्य जमादार म्हणून आणि आधीची नाईक म्हणून सेवा त्यांनी आपल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर आयुक्त कार्यालयात त्यांनी घालवली. आयुक्त चहल यांच्यासह आयुक्त कार्यालयाचे सहआयुक्त चंद्रशेखर चौरे आदींसह सर्व अधिकाऱ्यांनी घाणेकर यांना सेवेच्या शेवटच्या दिवशी गौरव करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.