अर्ध्या रस्त्यात रुग्णवाहिकेत झालेला बिघाड, त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांची सुरू असलेली घालमेल… तेवढ्यात तिथून मुख्यमंत्र्यांचा ताफा जातो… ते दृष्य पाहून मुख्यमंत्री खाली उतरतात आणि आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन त्यांना रुग्णालयाकडे मार्गस्थ करतात. ही कथा कुठल्या चित्रपटाची नव्हे, तर मुंबईतील रस्त्यावर घडलेला खराखुरा प्रसंग आहे.
शनिवार, ०८ जुलै २०२३. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वेळापत्रक नेहमीप्रमाणे व्यस्त होते. गडचिरोलीचा दौरा आटोपून ते मुंबईत परतल्यानंतर ठाण्याकडे जात होते. या दरम्यान चुनाभट्टी-कुर्ला येथील पुलावर एक रुग्णवाहिका बिघाडामुळे खोळंबल्याचे त्यांच्या लक्षात आले. रुग्ण आणि रुग्णवाहिकेतील नातेवाईकांची अडचण ओळखून मुख्यमंत्री शिंदे आपल्या वाहनातून उतरले आणि थेट बिघाड झालेल्या रुग्णवाहिकेजवळ पोहचले. त्यांनी परिस्थिती जाणून घेतली.
(हेही वाचा – अखेर राम पावला! चित्रपट प्रदर्शनाच्या २३ दिवसांनंतर लेखकाने मागितली जाहीर माफी)
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना धीर देत त्यांनी तिथूनच ठाण्यातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला. त्याचवेळी त्यांनी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देण्याचे निर्देश दिले. या रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्ण आणि नातेवाईक ठाण्यातील रुग्णालयाकडे मार्गस्थ झाल्यानंतरच, मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा रवाना झाला. वाहनांची प्रचंड वर्दळ, बिघडलेली रुग्णवाहिका आणि अनोळखी रस्ता, अशी स्थिती असतानाच, थेट मुख्यमंत्रीच आपल्या मदतीला धावून आल्याचे पाहून, त्यांनी दिलेल्या धीरामुळे रुग्णाच्या नातेवाईकांचे हात आपसुकच जोडले गेले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community