परळ येथील केईएम रुग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणामुळे ५२ दिवसांच्या लहान बाळाचा हात कापावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली. पालिका प्रशासनाने घटनेची माहिती मिळताच संपूर्ण प्रकरणाबाबत चौकशीचे आदेश दिले. या घटनेबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळाच्या कुटुंबियांना पाच लाखांची आर्थिक मदत देऊ केली. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाखांचा धनादेश बाळाच्या पालकांना देऊ केला.
यावेळी बाळाचे वडील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, भाजपच्या महिला मोर्च्याच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे मंगेश चिवटेदेखील उपस्थित होते. केईएम रुग्णालयातील घडलेला प्रकार समजताच महानगर पालिका प्रशासनाने चार प्राध्यापकांचा समावेश असलेली समिती नेमून प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत.
(हेही वाचा – Paneer : घरच्या घरी बनवा डेअरीसारखे मलाईदार आणि मऊ पनीर; जाणून घ्या रेसिपी)
काय आहे संपूर्ण प्रकरण –
परळ येथील केईएम रुग्णालयात १९ जूनला अश्विनी चव्हाण यांची मुदतपूर्व प्रसूती झाली. बाळाच्या उपचारात चुकीच्या औषधाचे इंजेक्शन दिले गेल्याचा आरोप पालकांनी केला आहे. १५ जुलैपासून बाळाचा हात काळा पडू लागला. हळूहळू बाळाची बोटे वाकडी झाली. हाताला संसर्ग झाल्याने बाळाचा उजवा हात कोपऱ्यापासून कापावा लागला.
याबाबत पालिका रुग्णालयाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केईएम रुग्णालयाला भेट दिली. बाळावर सर्वतोपरि चांगले उपचार करण्याचे आदेश डॉ. शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले. मुख्यमंत्री कार्यालयानेही या प्रकरणाबाबत सखोल माहिती घेतल्याचे डॉ. शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकांना धनादेश दिला आहे. त्याबाबतीतली आवश्यक कागदपत्रे देण्यात येणार आहे असेही डॉ. शिंदे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community