Eknath Shinde : केईएम रुग्णालयाच्या सहा वाॅर्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

130
Eknath Shinde : केईएम रुग्णालयाच्या सहा वाॅर्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केईएम रुग्णालयाच्या सहा वॉर्डचे बांधकाम (Eknath Shinde) युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामावर लक्ष द्यावे,असे निर्देश (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी (२१ ऑगस्ट) रात्री उशिरा केईएम रुग्णालयास अचानक भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. रुग्णांना मिळणाऱ्या दुधात कोणत्याही प्रकारची भेसळ आढळल्यास तत्काळ कडक कारवाई करण्याच्या सूचनाही रुग्णालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अचानक येण्याने केईएम रुग्णालयाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

यावेळी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रुग्णालयातील भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मी रुग्णालयाजवळच एका कार्यक्रमात आलो होतो. तो कार्यक्रम संपल्यानंतर मी रुग्णालयाला भेट दिली, असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Dengue : डासांपासून वाचण्यासाठी काळजी घ्या आणि डेंग्यूपासून स्वतःचा बचाव करा)

केईएम रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत असलेले सहा वॉर्ड देखील त्यांनी यावेळी पाहिले. ते बंद ठेवण्यामागे नक्की काय कारणे आहेत ते जाणून घेऊन हे विभाग तत्काळ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, रुग्णालयातील सहा वॉर्डचे काम येत्या दोन दिवसांत सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरून याठिकाणी आणखी ४०० ते ४५० रुग्णांवर उपचार करता येणार आहेत.

रुग्णांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून त्यात कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) स्पष्ट केले.रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी देखील संवाद साधून त्यांना मिळत असलेल्या उपचारांची माहिती घेतली. तसेच त्यांना कोणत्याही बाबतीत गैरसोय होते अथवा नाही तेदेखील जाणून घेतले. शिंदे यांनी थेट रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

केईएम ९७ वर्षे जुने रुग्णालय आहे. या रुग्णालयातील सुविधांचे अद्ययावत करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) सांगितले. केईएम येत्या दोन-तीन वर्षात शंभर वर्षे पूर्ण करत आहे. त्यामुळे या रुग्णालयातील रुग्णसेवा, येथील सुविधा आणखी आधुनिक करण्याच्यादृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चर्चेदरम्यान दिले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.