एसटी कर्मचाऱ्यांनी (ST employees strike) संप करू नये. सकारात्मक चर्चेतून मार्ग काढू, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. मंगळवारी सकाळपासूनच एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला असून, राज्यभरातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल आम्ही बुधवारी (०४ सप्टेंबर) संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावर (Sahyadri Guest House) यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वीही एक बैठक झाली होती. ( Eknath Shinde)
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) बुधवारी महाराष्ट्रात येणार आहेत. तसेच राज्यात गणपती येत आहेत. एसटी ही गावोगावी जाणारी आहे. अनेक नागरिक खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठामध्ये जाण्यासाठी एसटीचा वापर करतात त्यामुळे एसटीचा संप होऊ नये असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकतंच ई गव्हर्नस कार्यक्रमाला (E-Governance Programme) हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल विचारणा करण्यात आली. (Eknath Shinde)
‘या’ आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या
राज्यातील ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने काम बंद आंदोलन पुकारल्याने २५१ आगारांपैकी ३५ आगार पूर्णतः बंद आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन मिळण्याची आहे. तसेच २०१८ ते २०२४ पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ, ५८ महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी व घरभाडे भत्त्याची थकबाकी अशा मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. (Eknath Shinde)
हेही पाहा –