मुंबईतील नालेसफाईच्या कामांबाबत तसेच हिंदमाताच्या ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्यासंदर्भात भूमिगत टाक्या बनवून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याने याबाबत भाजपच्या नेत्यांकडून प्रशासनावर तीव्र आरोप करण्यात आले होते. परंतु राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण स्वत: आपत्कालिन नियंत्रण कक्षातील सी सी कॅमेरांदेवारे केलेल्या पाहणी ज्या २०० ठिकाणी पाणी तुंबल्याचे सांगितले जात होते, तिथे एकाही ठिकाणी पाणी नसून वाहतूक सुरळीत सुरु असल्याचे सांगितले. तसेच ज्या हिंदमाताच्या ठिकाणीही पाणी तुंबले जायचे, परंतु तिथेही पाणी नसल्याचे सांगत शिंदे यांनी प्रशासनाचे कौतुक करत या कामांबाबत समाधानही व्यक्त केले.
मुंबईत मंगळवारी होणाऱ्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर मुंबईतील विविध ठिकाणी तुंबलेल्या पाण्याचा तसेच इतर आपत्कालिन परिस्थितीचा आढावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना महापालिकेच्या वॉर रुममधून मुंबईचा आढावा घेतला. महापालिकेने चांगले काम केले आहे. एकूण२०० ठिकाणे पाण्याची होती, ही ठिकाणी पाणी कमी झालेले दिसले. हिंदमातालाही जास्त पाणी नव्हते, तिथे बिल्कूल दिसून आले नाही. त्यामुळे महापालिकेने चांगले काम केलेले आहे. जिथे पाणी साचते, तेथे यंत्रणा लावली आहे, पाणी तुंबणार नाही याचे योग्य नियोजन केले आहे,असे त्यांनी सांगितले.
( हेही वाचा : शिवसेनेच्या खासदारांना मतदान करायचे आहे द्रोपदी मुर्मू यांना)
रस्त्यांचा दर्जा सुधारणेवर अधिक लक्ष केंद्रीत करणे आवश्यक
नालेसफाईच्या कामांबाबत भाजपने आमदार आशिष शेलार यानी केलेल्या आरोपांबत त्यांच्या जर काही सूचना असतील तर त्याबाबतही मार्ग काढला जाईल, परंतु हिंदमाता येथे पाणी दिसले नाही याचा अर्थ महापालिकेने चांगले काम केले,असे शिंदे यांनी म्हटले आहे. मुंबईत सध्या खड्डयांची समस्या मोठ्याप्रमाणात असून याबाबत बोलतांना मुख्यमंत्र्यांनी, खड्डयांचा त्रास हा मुंबईकरांना होत असतो, त्यामुळे काँक्रिटचे रस्ते व्हायला हवे. रस्त्यांचा दर्जाही चांगल्याप्रकारे वाढवायला हवा,अशाप्रकारच्या जाहीर सूचनाच प्रशासनाला दिल्या असून सध्या खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्स वापरले जात असले तरी रस्त्यांचा दर्जा सुधारणेवर अधिक लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रशासनाला सांगितले.
याप्रसंगी आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता,अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आशिष शर्मा, पी. वेलरासू आणि डॉ. संजीव कुमार यांच्यासह आपत्कालिन व्यवस्थापनाचे संचालक महेश नार्वेकर आणि या विभागाच्या प्रमुख अधिकारी संगीता लोखंडे आदी उपस्थित होते.
मुंबईत नालेसफाई नीट होत नाही असा आरोप
मुंबईत नालेसफाई नीट होत नाही, असा भाजपच्या नेत्यांचा व नगरसेवकांचा आरोप होता, यासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता महापालिका आयुक्त व प्रशासकांनी परवा पावणे दोनशे मि. मी एवढा पाऊस पडला होता, तर सोमवारी ११५ मि.मी. एवढा पाऊस पडला, तर मंगळवारी सकाळी ३१५ मि.मी एवढा पाऊस पडला होता. मुंबईतील ५३१५सी.सी कॅमरे आहेत, या कॅमेऱ्यांतून कुठल्याही ठिकाणावर पाणी तुंबले नाही, याचा भक्कम पुरावा या कॅमेरांमधून पुढे आला आहे
वडाळा आणि चेंबूर आदी भागांमध्ये जिथे पाणी तुंबले आहे तो भाग बशीच्या आकारा सारखा खोलगट असल्याने त्याभागात पाणी साचलेले पहायला मिळतात. या भागांमध्ये एक ते दीड फुट पाणी तुंबल्यानंतरच पाण्याचा निचरा होतो. पंपिंग करून घेण्यासाठी तेवढयाप्रमाणात पाण्याची पातळी वाढणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community