Chief Minister Medical Assistance Cell च्या तत्परतेने पाच रुग्णांना तातडीची मदत

42
Chief Minister Medical Assistance Cell च्या तत्परतेने पाच रुग्णांना तातडीची मदत
Chief Minister Medical Assistance Cell च्या तत्परतेने पाच रुग्णांना तातडीची मदत

आर्थिक अडचणींमुळे उपचार मिळण्यास अडथळे येत असलेल्या पाच रुग्णांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या तत्परतेने पाच लाख रुपयांची तातडीची मदत मिळाली. या मदतीमुळे वेळेत उपचार मिळाल्याने रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या (Chief Minister Medical Assistance Cell) तत्परतेमुळे ही मदत मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

जनता दरबारात मुख्यमंत्र्यांनी दिला दिलासा

रुग्णांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात उपचारांसाठी मदतीची विनंती केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षास (Chief Minister Medical Assistance Cell) कार्यवाहीचे निर्देश दिले. कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक (rameshwar naik) यांनी तत्परतेने निर्णय घेत आरव चॅरिटेबल ट्रस्टच्या (Aarav Charitable Trust) माध्यमातून मदत उपलब्ध करून दिली.

गंभीर आजार असलेल्या रुग्णांना मदतीचा हात

किडनी प्रत्यारोपणाची गरज असलेल्या एका २८ वर्षीय महिलेला उपचारासाठी मदत मिळाली. तिच्या पतीने ही मदत वेळेवर मिळाल्याने धीर आणि आधार मिळाल्याचे सांगितले. ठाण्यातील १२ वर्षीय मुलगा रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. त्याच्या उपचारासाठी मिळालेल्या मदतीमुळे त्याच्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

ठाणे जिल्ह्यातील एका अपघातग्रस्त रुग्णाला पायावरील शस्त्रक्रियेसाठी मदत करण्यात आली. कोल्हापूरमधील एका रुग्णाला किडनी प्रत्यारोपणासाठी आणि छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) एका चिमुकल्याला वैद्यकीय उपचारांसाठी मदत देण्यात आली.

मुख्यमंत्री सहायता निधी – गरजूंसाठी मदतीचे आवाहन

मुख्यमंत्री सहायता कक्ष दानशूर व्यक्ती, उद्योजक आणि खाजगी संस्थांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे आवाहन कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे. गरजू रुग्णांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाशी खालील माध्यमांद्वारे संपर्क साधता येईल. (Chief Minister Medical Assistance Cell)

संपर्क माहिती:

📧 Mail ID: [email protected]
🌐 Website: https://cmrf.maharashtra.gov.in
📞 टोल फ्री क्रमांक: ९३२११०३१०३
📱 सोशल मीडिया:

Facebook: Cmrf Maharashtra
Instagram: cmrfmaharashtra
YouTube: Chief Minister Relief & Charity Hospital Helpdesk
X (Twitter): @CmrfMh

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.