मध्य प्रदेश (Madhya Pradesh) चे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच धार्मिक स्थळांवर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवण्यास बंदी घातली. नव्या सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेतला आणि सर्वत्र चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी महाकालचे दर्शन घेतले
लाऊडस्पीकर तपासण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये पथके तयार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉ. मोहन यादव यांनी त्यांच्या जन्मगावी उज्जैन येथे जाऊन तेथे महाकालचे दर्शन घेतले. तिथून ते थेट भोपाळला परतले आणि त्यांनी बैठक घेतली. मोहन यादव यांचा मोठा निर्णय भोपाळमध्ये कॅबिनेटची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांना तिथे जायला उशीर होत होता. त्यामुळे महाकालची पूजा आणि आरती झाल्यानंतर ते लगेच भोपाळकडे रवाना झाले. महाकालचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, “शपथ घेतल्यानंतर मी बाबा महाकालच्या दरबारात आलो आहे. माझ्यावर नवीन जबाबदारी देण्यात आली आहे, म्हणून मी बाबा महाकाल यांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो. कॅबिनेट बैठकीसाठी मी भोपाळला रवाना होत आहे. यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिनचे सरकार मध्य प्रदेशात आणखी प्रगती करेल.
Join Our WhatsApp Community