Pune : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु; पुण्यातून ७२९ ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रवाना

156
Pune : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु; पुण्यातून ७२९ ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रवाना
Pune : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु; पुण्यातून ७२९ ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रवाना

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत पुणे येथून ७२९ जेष्ठ नागरिक आणि ७१ साहाय्यक अशा ८०० यात्रेकरूंना घेऊन जाणारी जिल्ह्यातील पहिली भारत गौरव पर्यटन रेल्वे श्रीराम जन्मभूमी अयोध्येकडे रवाना झाली. या वेळी समाजकल्याण विभागाचे साहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून रेल्वे मार्गस्थ झाली. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अयोध्येकडे (Ayodhya) रवाना होणाऱ्या तीर्थयात्रेकरूंना चित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. या वेळी ‘जय श्रीराम, जय श्रीराम’ या जयघोषात पुणे (Pune) रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन ८०० यात्रेकरु तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे मार्गस्थ झाले. राज्यात ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनाने शासकीय दुखवटा जाहीर झाल्याने साधेपणाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

(हेही वाचा – Vote Jihad : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणूकीतही ‘व्होट जिहाद’, हिंदू मात्र अजूनही संभ्रमावस्थेत)

या वेळी आय.आर.सी.टी.सीचे जनरल मॅनेजर गौरव झा, क्षेत्रीय अधिकारी गुरुराज सोना, तसेच समाजकल्याण विभागातील कर्मचारी उपस्थित होते. या तीर्थयात्रेच्या निमित्ताने एका महत्त्वाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे उपमुख्यमंत्री पवार आपल्या चित्रफित शुभेच्छा संदेशात म्हणाले. ही योजना राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधून सुरु झाली आहे. तीर्थदर्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुणे (Pune) जिल्हा प्रशासनाचे उपमुख्यमंत्री पवार यांनी अभिनंदन केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.