मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष : १० महिन्यांत ६०.४८ कोटींची मदत वितरीत

राज्यातील एकही सर्वसामान्य - गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

178
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष : १० महिन्यांत ६०.४८ कोटींची मदत वितरीत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या दहा महिन्यांत कक्षाकडून ८१९२ रुग्णांना एकूण ६० कोटी ४८ लाख रुपयांची मदत दिली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून या योजनेचे मूळ संकल्पक तथा कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांच्या सर्व टीमने रुग्णसेवेत झोकून दिले आहे.

(हेही वाचा – Edible Oil Prices : खाद्यतेलाच्या दरातील घसरणीचा लाभ जलदगतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवायला हवा – केंद्रीय सचिव)

त्यामुळेच पहिल्याच जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख,डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०६० रुग्णांना ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२३७ रुग्णांना १० कोटी २७ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९५ लाख तर एप्रिल मध्ये विक्रमी १९८४ रुग्णांना ९ कोटी ९३ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

हेही पहा –

राज्यातील एकही सर्वसामान्य – गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेशच संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पहिल्या दिवशी दिला होता. त्यांच्या सुचनेचे तंतोतंत पालन करण्याचा आणि रुग्णांना दिलासा देण्याचा आम्ही सर्व सहकारी प्रामाणिक प्रयत्न करतो असे कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी शेवटी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.