मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ (Varsha) वर प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या श्री गणरायाच्या मूर्तीचे दर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे ‘वर्षा’वर भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना थेट ‘वर्षा’वर प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना गणेश दर्शनाबरोबर मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान पाहणे शक्य झाले आहे.
(हेही वाचा आधीचे पंतप्रधान इफ्तार पार्टी ठेवायचे त्याला सरन्यायाधीश जायचे; Devendra Fadanvis यांचा टोला)
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून ‘वर्षा’वर (Varsha) राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची गर्दी वाढली आहे. अशातच गणपतीच्या निमित्ताने केंद्रीय नेते, राजकीय पक्षाचे नेते, उद्योजक तसेच विविध देशांचे राजदूत ‘वर्षा’वर गणपती दर्शनासाठी येत आहेत. शिंदे यांनी ‘वर्षा’वरील गणपतीची पूजा, आरती, स्वच्छता कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते करण्याचा नवा पायंडा पाडला आहे. तसेच गेल्या वर्षीपासून ‘वर्षा’वरील (Varsha)गणपतीचे दर्शन सर्वसामान्यांना खुले केले आहे. त्यामुळे सकाळपासून अनेक भाविक कुटुंबासह ‘वर्षा’वर गणेश दर्शनासाठी येतात. ‘वर्षा’च्या प्रवेशद्वारावर नाव नोंदणी करून भाविकांना थेट वर्षावर प्रवेश दिला जातो. गणेश दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सन्मानाने उपरणे आणि प्रसाद देण्यात येतो.अनंत चतुर्दशीच्या दिवशी ‘वर्षा’वरील गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जातो. त्यामुळे येत्या काही दिवसात ‘वर्षा’ वर गणपती दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community