- सचिन धानजी, मुंबई
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सर्वच रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटचे (CC Road) काम करण्यासाठी मागील वर्षी मोठ्या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. या कामांसाठी मोठ्या कंत्राटदारांना काम दिल्यानंतरही पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेल्याचे दिसून आले. बोरीवली पश्चिम येथील चिकूवाडीतील जॉगर्स पार्क जवळील रस्त्यांचे काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण झाले होते. परंतु या रस्त्यांच्या काही भागांमध्ये रस्ता खराब झाला असून काही भागांमध्ये तर रस्ता खचला गेल्यानंतरही त्यात केवळ डांबर टाकून तेवढा भाग बुजवण्याचा थातुरमातूर प्रयत्न केला आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर या रस्त्याकडे आरेतील त्या खराब रस्त्याप्रमाणे लक्ष वेधतील का सवाल रहिवाशांकडून केला जात आहे. चक्क उखडला गेला असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील सर्व रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरण (CC Road) करण्यासाठी मागील वर्षी सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या निविदा काढून कंत्राटदारांची निवड केली. मात्र, पहिल्या टप्प्यात नेमलेल्या कंत्राटदारांकडून दोन वर्षांमध्ये ही कामे केली जातील असा दावा महापालिका आयुक्तांसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्याअंतर्गत महापालिकेच्या परिमंडळ सातमधील आर मध्य, मध्य उत्तर आणि आर दक्षिण विभागासाठी एक स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये आर मध्य विभागातील चिकू वाडी येथील जॉगर्स पार्क जवळील रस्त्यांचे काम चार महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले असून पहिल्याच पावसात या रस्त्यावरील काही भागांमधील खडीच वाहून जात तो भाग खराब झाला असल्याची बाब समोर आली आहे.
(हेही वाचा – Indian Railway च्या रुळांना लक्ष्य करा; पाकिस्तानातील दहशतवादी फरहातुल्ला घोरीची चिथावणी)
नक्की बनवला कधी?
चिकूवाडीतील जॉगर्स पार्क रस्त्यावरील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना शाखा क्रमांक १७ आणि सोनीपार्क सी व डी विंगसमोरील व विनस इमारतीच्या प्रवेशमार्गासमोरील नव्याने सिमेंट काँक्रीट (CC Road) केलेल्या रस्त्यावरील खडी वाहून जात हा भाग खराब झाला आहे. तब्बल ५० मीटर परिसरातील रस्त्यावरील खडी वाहून गेला आहे. तसेच लिंक रोड करून येणारा मार्ग जिथे जोडला जातो त्याच जंक्शनलाच सांधा खचला गेल्याने तिथे खड्डा पडला गेला. तिथे आता डांबर टाकून केवळ तात्पुरती डागडुजी केली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी बनवलेला रस्ता खचून खड्डा पडणे आणि पहिल्याच किरकोळ पावसात खडी वाहून जाण्याच्या प्रकारामुळे नागरिकांकडूनही चिंता तसेच आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.
तसेच याच मार्गावर रेवती को-ऑप. हाऊसिंग सोसायटी एबीसी समोरील भागामध्येही सर्व खडी वाहून गेल्यामुळे तिथे आत्ताच खड्डे स्वरूपात पृष्ठभाग तयार झाला आहे. तर अनेक ठिकाणी झाडांच्या बुंध्या भोवतीची जागा सोडून देण्यात आलेली आहे. मात्र काम पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे कंत्राटदाराने या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. शिवाय भूषण हेरिटेज सोसायटी समोरील रस्त्याच्या समोरील बाजुचा भाग हा पूर्णपणे वाहून गेलेला आहे. चिकूवाडी शेअर रिक्षा स्टँड येथील जोड रस्त्याच्या प्रारंभी भागही अक्षरश: वाहून गेल्याने हा रस्ता नक्की बनवला कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community