एकीकडे भारत विज्ञान- तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगतीची नवनवी शिखरे गाठत असला तरी दुसरीकडे समाजात अजुनही अनिष्ठ रुढी, प्रथा-परंपरा पाळल्या जात आहेत. त्यामुळे या नवनवीन शिखेर पादक्रांत करणाऱ्या भारतात रुढी-पंरपरांची पाळेमुळे उखडून टाकण्यात अपयश आले आहे. बालविवाहाची समस्या अद्याप जैसे थे आहे. आजही देशात प्रत्येक पाच मुलींपैकी एका मुलीचा बालविवाह (Child marriage) होतो, अशी माहिती केंद्रीय महिला व बालविकासमंत्री अन्नपूर्णा देवी (Annpurna Devi) यांनी दि. २६ नोव्हेंबर रोजी दिली.
(हेही वाचा : Rishabh Pant : रिषभ पंतला कर वजा जाता २७ कोटींपैकी किती रक्कम मिळणार?)
दरम्यान केंद्रीय महिला व बालविकासमंत्री अन्नपूर्ण देवी म्हणाल्या की, गेल्या वर्षभरात दोन लाख बालविवाह रोखण्यात आले आहेत. हे बालविवाह (Child marriage) रोखण्यासाठी ‘बालविवाहमुक्त भारत’ (Child marriage free India) या मोहिमेचा केंद्र सरकारकडून प्रारंभ करण्यात आला आहे. २०२९ पर्यंत बालविवाहाचा दर पाच टक्क्यांहून कमी करण्याचे आमचे उद्दिष्टे आहेत. या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी बालविवाहमुक्त भारत (Child marriage free India) पोर्टल सुरु करण्यात आले होते. तसेच जागरूकता वाढवण्यासह अशा घटनांची दखल व मोहिमेचा आढावा घेण्यात येईल. (Child marriage)
देशातील सात राज्ये आणि जवळपास ३०० हून जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत बालविवाहाचे प्रमाण जास्त आहे. यात पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, राजस्थान, त्रिपुरा, आसाम आणि आंध्र प्रदेश या सात राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे या मोहिमेत ही राज्ये आणि जिल्हे केंद्रस्थानी असतील. (Child marriage)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community