कोरोना काळातील लॉकडाऊननंतर बालवविवाह वाढले असल्याचा दावा महाराष्ट्राच्या महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. लातूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला.
मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेकांचं अभ्यासावरून लक्ष उडालं आहे. मोबाईलमुळे आई-वडील आणि पालकांमध्ये असलेला संवाद संपला आहे. यामुळे काही मुली प्रेमात पडून घरातून पळून जाऊ लागल्या. करोना काळात प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून लॉकडाऊन लावला होता. या काळात महाराष्ट्रात बालविवाह वाढले, असे मत अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एका संमेलनात व्यक्त केले.
लातूर जिल्ह्यात 37 बालविवाह रोखले. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण वाढल्याबाबत त्यांनी कोणतीही ठराविक आकडेवारी सादर केलेली नाही. गावांमध्ये ग्रामसभेच्या वेळी बालविवाह रोखण्याबाबत ठोस उपाययोजनांवर चर्चा व्हायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
Join Our WhatsApp Community