मुले घरापेक्षा शाळेतच समाधानी; NCERT चे सर्वेक्षण

अत्यंत धावपळीच्या आणि जीवघेण्या स्पर्धेच्या जगात प्रौध मंडळी आत्मविश्वास गमावून बसत आहे. मात्र, कोवळ्या वयातील नव्या पिढीमध्ये आत्मविश्वास गमावून बसत आहे. मात्र, कोवळ्या वयातील नव्या पिढीमध्ये आत्मविश्वास ठासून भरला आहे. देशातील सहावी ते बारावीपर्यंतची तब्बल 70 टक्के मुले जीवनाबाबत प्रचंड आत्मविश्वास बाळगतात, तर 73 टक्के मुलांना घरापेक्षाही जास्त आनंद शाळेतच मिळत आहे, असा आशादायक निष्कर्ष एनसीईआरटीने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आला आहे.

( हेही वाचा: फिल्मसिटीमध्ये ‘हेरॉईन’ची डिलेव्हरी; एकाला अटक )

सोमवारी देशभर बालक दिन साजरा होत असताना, या मेंटल हेल्थ अॅण्ड वेलबिइंग ऑफ स्कूल स्टुडंट्स सर्व्हेतील निष्कर्ष देशाच्या नव्या पिढीची मन:स्थिती स्पष्ट करत आहे. सध्या शालेय जीवनात असलेली मुले अभ्यासात तरबेज होत असली तरी मानसिक पातळीवर त्यांच्या कोणत्या अडचणी आहेत, हे जाणून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण खाते व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने देशभरातील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले.

घरापेक्षा शाळेतच अधिक आनंदी

या सर्वेक्षणात 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशातील 3 लाख 79 हजार 842 विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था जाणून घेण्यात आली. यात महाराष्ट्रातील 15 हजार 383 विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले गेले. विशेष म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असून, घरापेक्षा शाळेतच अधिक आनंदी असल्याचे मत तब्बल 73 टक्के विद्यार्थ्यांनी नोंदवले. अनेक मुलांना ताणतणावाची समस्या केवळ 28 टक्के आहे तर काही  मुले ताण घालवण्यासाठी योगा करतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here