BMC School Midday Meal : महापालिका आणिक गाव शाळेतील मुलांना विषबाधा, दाखल केले रुग्णालयात

सुरुवातीला दोन मुलांना खिचडी खाल्यानंतर उलटी होण्याचे प्रकार घडले आणि या दोघांनी उलटी केल्यानंतर इतर विद्यार्थ्यांना उलटी होण्याचे प्रकार घडले.

240
BMC School Midday Meal : महापालिका आणिक गाव शाळेतील मुलांना विषबाधा, दाखल केले रुग्णालयात
BMC School Midday Meal : महापालिका आणिक गाव शाळेतील मुलांना विषबाधा, दाखल केले रुग्णालयात

मुंबई महापालिकेच्या गोवंडी आणिक गाव महापालिका शाळेतील मध्यान्ह भोजनामुळे काही मुलांना पोटात मळमळ होऊन उलट्या होण्याचे प्रकार घडले आहे. या घटनेनंतर त्वरीत यासर्व शाळकरी मुलांना गोवंडीतील पंडित मदन मोहन मालवीय रुग्णालय अर्थात शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून यासर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. सुरुवातीला दोन मुलांना खिचडी खाल्यानंतर उलटी होण्याचे प्रकार घडले आणि या दोघांनी उलटी केल्यानंतर इतर विद्यार्थ्यांना उलटी होण्याचे प्रकार घडले. मात्र, सुरुवातीला ज्या दोन्ही मुलांना उलटी झाली, त्या दोघांची प्रकृती काही प्रमाणात ठिक नव्हती असे बोलले जात आहे. (BMC School Midday Meal)

मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना मध्यान्ह भोजन अंतर्गत खिचडी उपलब्ध करून दिली जाते. त्या अंतर्गत गोवंडीतल आणिक गाव महापालिका शाळेमध्ये दुपारी या मध्यान्ह भोजनाचे वाटप केले. या महापालिका शाळेतील तब्बल हिंदी माध्यमातील १८९ आणि मराठी माध्यमातील ५१ मुलांना या खिचडीचे वाटप झाल्यानंतर काही वेळाने दोन मुलांना प्रारंभी पोटात मळमळ होऊन उलटी झाले. त्यामुळे या दोन्ही मुलांच्या पोटात बिघडून उलट्या झाल्यानंतर इतर मुलांच्या पोटात मळमळ होऊन उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे उलट्या झालेल्या सर्व मुलांना तातडीने गोवंडी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये ९ मुलांचा आणि ७ मुलींचा अशाप्रकारे एकूण १६ विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या नंतर रुग्णालयाचे डॉक्टर संदीप यांनी अन्न विषबाधेमुळे दाखल केलेल्या यासर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. (BMC School Midday Meal)

ही बाब निदर्शनास आल्यामुळे सदर संस्थेच्या स्वयंपाकगृहामध्ये डी. गंगाथरण- सह आयुक्त (शिक्षण), राजेश कंकाळ- शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व वाणी उपशिक्षणाधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून स्वयंपाकगृहातील उरलेल्या आहाराचा नमुना व इतर साहित्य तपासणीसाठी मनपा प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. शांताई महिला संस्थेकडून सर्व शाळांना पुरवठा करण्याचे कामकाज थांबविण्यात आलेले असून सदर शाळांमध्ये पर्यायी संस्थांना आहार पुरवठ्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. (BMC School Midday Meal)

महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या शाळेतील एकूण १८९ मुलांना या खिचडीचे वाटप करण्यात आले होते. त्यातील दोन मुलांना प्रथम उलटया झाल्या आणि त्यांना झालेल्या उलटीमुळे इतर मुलांच्या पोटात मळमळ होऊन त्यांनाही उलट्या तसेच त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु जर या खिचडीमध्ये दोष असता तर सर्वच मुलांना याचा त्रास व्हायला हवा होता. पण सुरुवातीला दोन मुलांना याचा त्रास झाला आणि त्यांचे पाहून इतरांना झाला आहे. सुरुवातील ज्या दोन मुलांना उलट्या झाल्या होत्या, तयाची आरोग्य तपासणी केली असता त्यांना आधीपासूनच काही त्रास होता. त्यामुळेच त्यांना ही खिचडी खाल्ल्यानंतर उलटी झाल्याचे बोलले जात आहे. (BMC School Midday Meal)

(हेही वाचा – World Cup 2023 : भारत – पाक सामना पाहण्यासाठी अमिताभ, रजनीकांत सचिन आणि बरेचजण……..)

या शाळेला खिचडीचा पुरवठा हा शांताई महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. या शाळेसह ही संस्था एकूण २५ शाळांमधील ७ हजार मुलांना मध्यान्ह भोजनाचा पुरवठा करते. मध्यवर्ती स्वयंपाक गृहातून या खिचडीचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शुक्रवारी हीच खिचडी २५ शाळांमधील मुलांना देण्यात आली होती. त्यामुळे या खिचडीतून विषबाधा होण्याचा प्रकार कमी असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सहआयुक्त डी. गंगाथरन यांनी गुरुवारी महापालिका शाळांमध्ये खिचडीचा पुरवठा करणाऱ्या सर्व संस्थांची शाळा घेऊन त्यांना पोषक आहार तसेच दर्जेदार जेवण पुरवण्याचे निर्देश देत मार्गदर्शन केले होते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडल्याने सर्व शाळांना आता अधिक दक्ष राहावे लागणार आहे. (BMC School Midday Meal)

महानगरपालिका आयुक्तांनी सदर घटनेची दखल घेऊन सदर घटनेबाबत जबाबदार संस्था व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून २४ तासांच्या आत अहवाल सादर करणे व दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश निर्गमित केले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. (BMC School Midday Meal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.