बच्चे कंपनी होणार लसवंत! ‘कोव्होव्हॅक्सला’ WHO ची मान्यता

126

अदर पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या ‘कोव्होव्हॅक्सला’ या कोरोना लसीला लहान मुलांसाठी आपत्कालीन वापर करण्यास जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशात आता १८ वर्षांखालील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लशीच्या मात्रा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी ट्विटर या समाज माध्यमावर ही माहिती दिली.

कोरोनाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी देशात वर्षाच्या सुरुवातीपासून केंद्रसरकारकडून मोफत लसीकरण मोहिम सुरु कऱण्यात आली आहे. यात पुण्यातील सीरम इन्टिट्यूट ऑफ इंडियाची निर्मिती असलेल्या कोव्हिडशिल्ड आणि हैदराबाद येथील भारत बायोटॅक कंपनीच्या कोव्हॅक्सिन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संगनमताने लसीकरण केंद्रात मोफत उपलब्ध आहे. या दोन लसीनंतर कोवोव्हॅक्स ही भारतातील तिसरी लस आता १८ वर्षांखालील मुलांसाठी उपलब्ध होणार आहे. या लशीची पहिली खेप बाजारात लवकरच उपलब्ध होईल, असे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

आरोग्य संघटनेने दिली मान्यता

सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य अधिकारी अदर पुनावाला यांनी जागतिक आरोग्य संघटनेने कोव्होव्हॅक्सला दिलेल्या मान्यतेचे स्वागत केले आहे. कोरोना लढाईतील हा मैलाचा दगड आहे. कोव्होव्हॅक्सला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिली असून ही लस सुरक्षित आहे व तिची परिणामकारकताही सिद्ध झाली आहे. असे ट्विट करत अदर पुनावाला यांनी आनंद व्यक्त केला आहे.

( हेही वाचा : प्रवाशांचा खोळंबा! रविवारी मध्य रेल्वेच्या ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक )

जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका

० कोव्होव्हॅक्स ही जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळालेली नववी लस आहे

० कमी उत्त्पन्न असलेल्या देशांमधील लसीकऱण मोहिमेला वेग येण्यासाठी या लसीला मंजूरी दिली आहे

० भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून लसीची पडताळणी झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळण्याचे निकष पूर्ण झालेत

० नोवाव्हॅक्स या मूळ लसीची निर्मिती असलेल्या कंपनीचा परवाना मिळाल्यानंतर भारतासाठी ही लस बनवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला परवानगी देण्यात आली

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.