सणावारादरम्यान परीक्षा न घेता त्या अगोदरच संपवण्याची मागणी पालकांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. येत्या 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. याचदरम्यान अनेक शाळांच्या सहामाही परीक्षांचे आयोजन 18 सप्टेंबरपर्यंत केले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या अगोदरच परीक्षा संपवण्याची मागणी पालकांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.
नवी मुंबईतील काही सहामाही शाळांनी सहामाही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये गणेशोत्सवाच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षांचे नियोजन केले आहे. यंदा गणेशोत्सवाच्या सुरुवातीला शनिवार आणि रविवार येत असल्याने अनेक पालकांनी दोन दिवस अगोदर गावी जायचे नियोजन केले आहे, मात्र या परीक्षा गणेशोत्सवाच्या अगोदरच्या दिवसापर्यंत असल्याने गावी कसे जायचे, असा प्रश्न अनेक पालकांना पडला आहे.
(हेही वाचा – Gangotri Highway Accident : गंगोत्री महामार्गावर बस दरीत कोसळून सात जणांचा मृत्यू)
गणेशोत्सवाला सुट्टी न देणाऱ्या शाळांना या काळात पाच दिवसांची सुट्टी देऊन तोंडी किंवा लेखी अशा कोणत्याही स्वरुपात परीक्षा घेऊ नयेत, असे परीपत्रक शालेय शिक्षण विभागाने काढावे, अशी मागणी विद्यार्थी आणि पालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
राज्यभरात गणेशोत्सवाच्या काळात अनेक शाळांना गौरी-गणपती विसर्जनापर्यंत सुट्टी दिली जाते, मात्र काही शाळा या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतात. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community