China Dam : ब्रह्मपुत्रा नदीवर चीन बांधणार जगातील सर्वांत मोठे धरण; भारतासाठी मोठा धोका, चीनचे स्पष्टीकरण

172
China Dam : ब्रह्मपुत्रा नदीवर चीन बांधणार जगातील सर्वांत मोठे धरण; भारतासाठी मोठा धोका, चीनचे स्पष्टीकरण
China Dam : ब्रह्मपुत्रा नदीवर चीन बांधणार जगातील सर्वांत मोठे धरण; भारतासाठी मोठा धोका, चीनचे स्पष्टीकरण

चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वांत मोठे धरण बांधण्याचा घाट घातला आहे. तिबेट पठाराच्या पूर्व भागात हे धरण असणार आहे. वर्ष २०२० मध्ये चीनच्या पॉवर कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, यारलुंग झांगबो नदीच्या खालच्या स्तरावर बांधण्यात येत असलेल्या या धरणाची वार्षिक 300 अब्ज KWH वीज निर्मिती करण्याची क्षमता असेल. सध्या मध्य चीनमध्येच उभारलेल्या जगातील सर्वात मोठ्या थ्री गॉर्जेस धरणाची क्षमता 88.2 अब्ज KWH आहे. आता नवीन धरणाची क्षमता यापेक्षा 3 पट जास्त असेल. (China Dam)

(हेही वाचा – केरळ मिनी पाकिस्तान आहे; म्हणून राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा निवडून येतात; Nitesh Rane यांचे थेट विधान)

या धरणामुळे भारत आणि बांगलादेशात मोठा पर्यावरणीय धोका होऊ शकतो, याविषयी भारताने चिंता व्यक्त केली आहे.
हा भाग हिमालयातील भूकंपप्रवण क्षेत्रात आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत अनेक देशांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
या धरणामुळे अनेक घातक परिणाम होऊ शकतात. या धरणामुळे पर्यावरणाची हानी तर होईलच, पण भूकंप आणि पुराचा धोकाही निर्माण होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. नासाचे शास्त्रज्ञ बेंजामिन फोंग चाओ यांनी चीनच्या थ्री गॉर्जेस धरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर, तसेच ग्रहाच्या स्थितीवर परिणाम होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला होता. आता चीन थ्री गॉर्जेस धरणाच्या तिप्पट क्षमतेचे धरण बांधत असल्याने त्याचा परिणाम आणखी मोठा असू शकतो.

असे असले, तरी चीनने हे धरण बांधण्याच्या योजनेचे चीनने समर्थन केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून व्यक्त होत असलेली चिंता धुडकावून लावत चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण उभे करण्याच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. चीन या योजनेमध्ये तब्बल १३७ अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक करणार आहे.

तिबेटमधून उगम पावणारी यारलुंग झांगबो नदी भारतात ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाते. ही भारतातील अरुणाचल प्रदेश आणि आसाम राज्यातून दक्षिणेकडे बांग्लादेशकडे वाहते. चिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तिबेटच्या जलविद्युत प्रकल्पाचा त्याचा पर्यावरणावर कोणताही विशेष परिणाम होणार नाही किंवा त्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार नाही. असे असतानाही भारत आणि बांग्लादेशने या धरणाबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली आहे. या प्रकल्पामुळे केवळ स्थानिक पर्यावरणावरच परिणाम होणार नसून नदीच्या प्रवाहावरही परिणाम होण्याची भीती आहे. (China Dam)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.