गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या समाधानकारक असली, तरी कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनमधून चिंता वाढवणारी घटना समोर येत आहे. संपूर्ण जगाला हादरवून सोडणा-या कोरोनाने चीनमध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. चीनच्या अनेक शहरांत कोरोना रुग्णांची संख्या ही गेले काही दिवस सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही एक चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे.
काही शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन
रविवारी चीनमध्ये 3 हजार 393 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे. दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच चीनने 3 हजारांहून अधिक रुग्णांचा आकडा पार केला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता चीनच्या काही शहरांत पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण चीनच्या शेन्जेन शहरात रविवारी लॉकडाऊन करण्यात आले आहे. हे शहर हाँगकाँगच्या सीमेवर असून, हाँगकाँगमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता हा निर्णय घेण्यात आल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
China on brink of biggest COVID-19 crisis since Wuhan as cases triple
— Press Trust of India (@PTI_News) March 13, 2022
वाढली चिंता
शनिवारी चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या ही 2 हजार इतकी होती. तर रविवारी ही संख्या हजाराने वाढली आहे. शांघायमधील शाळा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. चीनमधील 19 शहरांत ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हायरसचा प्रादुर्भाव असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून अनेक शहरांत लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community