Karachi Blast मुळे चीन-पाक संबंधांना सुरुंग; बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवर संशय

165
Karachi Blast मुळे चीन-पाक संबंधांना सुरुंग; बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवर संशय
Karachi Blast मुळे चीन-पाक संबंधांना सुरुंग; बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवर संशय

पाकिस्तानातील कराची विमानतळावर (Karachi Blast) झालेल्या स्फोटाने चीन-पाक संबंधांवर तणाव निर्माण केला आहे. या स्फोटामध्ये दोन चिनी कामगारांसह १७ जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद विरोधी पथकाच्या म्हणण्यानुसार, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा हल्ल्यात हात असून पाकिस्तान व चीनचे संबंध कमजोर करण्याचा त्यांचा हेतू होता. या हल्ल्यासाठी सुमारे ८० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. चीन-पाक आर्थिक कोरिडॉर (CPEC) प्रकल्पामुळे पाकिस्तानात हजारो चिनी नागरिक काम करत आहेत. त्यामुळे सुरक्षा चिंता वाढली आहे.

(हेही वाचा – Pandharpur येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची दर्शन रांग होणार अधिक सुसज्ज ; सरकारची ‘एवढ्या’ कोटींची तरतूद)

CPEC च्या दुसऱ्या टप्प्यात असतानाच पाकिस्तानी कर्ज संकट व चिनी कामगारांवरील हल्ल्यांमुळे बीजिंग नाराज आहे. चीनच्या पाठिंब्यामुळे पाकिस्तान संकटातून जात असला तरी, वॉशिंग्टनसोबत संबंध सुधारण्याच्या इस्लामाबादच्या प्रयत्नांवर चीनची नाराजी आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आर्थिक सुधारणांसाठी चीनकडे मदतीची मागणी केली आहे. IMF कडून ७ अब्ज डॉलर्सच्या नवीन कर्जासाठी पाकिस्तानने चीनला आपल्या कर्ज आराखड्यात सुधारणा करण्याची विनंती केली आहे. बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये चिनी नागरिकांवरील हल्ल्यांमुळे बीजिंगने सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

पाकिस्तानने अलिकडे अझम-ए-इस्तेकम या नवीन मोहिमेंतर्गत दहशतवादविरोधी अभियानास मान्यता दिली. त्यामुळे CPEC प्रकल्पाच्या सुरक्षा वाढविण्याचा प्रयत्न आहे. चीन (china) आणि पाकिस्तान (Pak) यांच्यातील संरक्षण संबंध अजूनही मजबूत आहेत. मात्र आर्थिक तणावामुळे दरी वाढत आहे. चीनच्या ७२% बाह्य कर्जावर पाकिस्तान अवलंबून आहे. अशा वेळी इस्लामाबादच्या अमेरिकेवर वाढत्या संबंधांमुळे बीजिंगमध्ये अस्वस्थता आहे. पाकिस्तान, चीन व अमेरिका यांच्यात तटस्थ राहण्याच्या प्रयत्नात आहे; परंतु वॉशिंग्टनच्या मदतीने मिळालेल्या आर्थिक समर्थनामुळे चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. CPEC च्या विस्तारामध्ये बीजिंग अजूनही प्रमुख घटक असून चीन-पाक संबंधातील कोणतीही घटना त्यांच्या व्यापक आर्थिक आणि राजकिय धोरणावर परिणाम करू शकते. (Karachi Blast)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.