शी जिनपिंग सरकारच्या विरोधात चीनमध्ये असंतोष, विद्यार्थी रस्त्यावर उतरले

106

चीनमधील विविध शहरांतील रस्त्यांवर चीन सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने सुरु आहेत. दूतावास असलेल्या बीजिंगच्या चाओयांग जिल्ह्यात शेकडो विद्यार्थी जमले आहेत. विद्यार्थ्यांमधील हा असंतोष हळूहळू चीनमधील इतर शहरे आणि विद्यापीठांमध्ये पसरत चालले आहेत. त्यामुळे चीनच्या प्रशासनाला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागल आहे. चीनमध्ये शी जिनपिंग सरकारच्या विरोधात मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

बीबीसी पत्रकाराला मारहाण

दरम्यान, रविवारी, २८ नोव्हेंबर रोजी एक पत्रकार चीनमधील निदर्शने कव्हर करण्यासाठी घटनास्थळी पोहोचला होता, परंतु पोलिसांनी त्याला तेथे अटक केली. एड लॉरेन्स असे या पत्रकाराचे नाव असून तो शांघायमध्ये सुरू असलेली निदर्शने कव्हर करण्यासाठी गेला होता. पोलिसांनी लॉरेन्सला तासनतास ताब्यात ठेवले. यादरम्यान त्याला पोलिसांनी मारहाण केली. बीबीसीने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, “आमच्या पत्रकारावर आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर हल्ला झाला हे पाहून खूप त्रास होतो. शी जिनपिंग यांच्या विरोधात घोषणाबाजी करत लोक चीनच्या रस्त्यावर उतरले आहेत. लोकांनी डाव्या सरकारला आव्हान देऊन खुर्ची सोडायला सांगितल्याचा व्हिडीओ समोर आल्याचे दावे करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.