China Radar System : भारतासाठी धोक्याची घंटा; चीनने म्यानमार सीमेजवळ उभारली रडार प्रणाली

44

चीनने अलीकडेच म्यानमार (Myanmar) सीमेजवळील युनान प्रांतात एक नवीन महाकाय रडार प्रणाली उभारली आहे. जी भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी धोकादायक बनली आहे. लार्ज फेज्ड एरे रडार (एल्.पी.ए.आर्.) या प्रगत रडार प्रणालीचा पल्ला (रेंज) ५ हजार किलोमीटरपेक्षा अधिक आहे. या रडार प्रणालीद्वारे चीन हिंद महासागराच्या मोठ्या क्षेत्रावर, तसेच भारतीय हद्दीत खोलवर देखरेख करू शकतो. चीनच्या या रडार प्रणालीचा सर्वांत मोठा धोका म्हणजे त्याला त्याद्वारे भारताच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर लक्ष ठेवता येते. (China Radar System)

(हेही वाचा – Champions Trophy का खेळली जाते ? यामागचा इतिहास तुम्हाला माहित आहे का ?)

एल्.पी.ए.आर्. हे एक अत्याधुनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची पूर्वसूचना देणारे रडार आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे जैविक, रासायनिक किंवा आण्विक अस्त्रे वाहून नेऊ शकतात. एल्.पी.ए.आर्. ही प्रणाली चीनच्या विस्तारित संरक्षणाचा आधारस्तंभ असल्याचे म्हटले जाते. या प्रणालीमुळे चीनने भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर बारीक लक्ष ठेवण्याची क्षमता प्राप्त केली आहे. भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने युनान प्रांतात एल्.पी.ए.आर्. बांधले आहे. हे चीनच्या आक्रमकतेचे आणि त्याच्याकडे असलेल्या प्रगत यंत्रणेचे उदाहरण आहे.

भारताने अलीकडेच अग्नी-५ आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे (Intercontinental Ballistic Missiles) प्रक्षेपण केले आहे, ज्यामुळे चीन घाबरला आहे. भारत त्याचा हायपरसोनिक क्षेपणास्त्र कार्यक्रम वेगाने पुढे नेत आहे आणि चीन त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहे. (China Radar System)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.