चीनी हॅकर्सकडून भारतातील केंद्रशासित प्रदेश लक्ष्य

79

भारतावर कुरघोडी करण्याची चीन सवय कमी झालेली नाही. चीन नेहमी भारताच्या विरोधात कोणते ना कोणते नवीन कारस्थान रचत असतो. आता चीनच्या हॅकर्सनी केंद्रशासित प्रदेशाची वीज व्यवस्था ठप्प करण्यासाठी हल्ला केला आहे. या हॅकर्सचा उद्देश वीज पुरवठा यंत्रणा खंडित करून माहिती चोरण्याचा होता. यापूर्वी मुंबईतील विद्युत भारनियमन केंद्रांवर असाच हॅकर्सनी हल्ला केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, चिनी हॅकर्सनी वीज पुरवठा खंडीत सात प्रयत्न केले आहेत, ज्याचा उद्देश भारतीय वीजपुरवठा यंत्रणा बंद करणे हा होता. या संदर्भात केंद्र सरकारकडूनही दुजोरा मिळाला आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी सांगितले की, चिनी हॅकर्सनी दोनदा वीज खंडीत करण्याचे प्रयत्न केले आहेत, लडाखची वीजपुरवठा यंत्रणा ठप्प होती. जो यशस्वी झाला नाही. असे हल्ले हाणून पाडण्यासाठी आम्ही आमची सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

(हेही वाचा महाराष्ट्राची कमान आता गडकरींच्या हाती!)

मुंबईवरही झाला होता हल्ला

12 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबईतील दिवे गेले. यासंदर्भात महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाकडून चीन आणि इंग्लंडमधून सायबर हल्ले झाल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यामुळे ग्रीडमध्ये बिघाड झाला होता, मात्र केंद्रीय ऊर्जा विभागाने त्याचा इन्कार केला, तर केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंह यांनी याला दुजोरा दिला आहे. मुंबईतील इलेक्ट्रिकल लोड सेंटर्सची SCADA सिस्टीम ज्यावर सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यात चीन, इंग्लंडसह आठ ठिकाणांहून सायबर हल्ला झाला होता. एका खासगी मीडिया हाऊसनुसार, चिनी हॅकर्सनी आतापर्यंत सात वेळा देशाची वीज वितरण व्यवस्था ठप्प करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये सात भारनियमन केंद्रांना लक्ष्य करण्यात आले आहे.

गलवान संघर्षाच्या वेळीही चिनी हॅकर्स सक्रिय होते

गलवान व्हॅलीमध्ये भारतीय लष्कराच्या पराक्रमामुळे चिनी सैनिक अस्वस्थ होते, त्या वेळीही चिनी हॅकर्स भारतीय वीज प्रकल्पांना लक्ष्य करत होते. परंतु सुरक्षा यंत्रणांच्या सक्रिय सहभागामुळे असे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.