बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर येथील इस्लामिक कट्टरपंथींकडून हिंदू अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाला. इस्कॉनचे (ISKCON) चिन्मय कृष्ण दास (Chinmay Krishna Das) यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा खोटा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या चिन्मय कृष्ण दास (Chinmay Krishna Das) यांची प्रकृती गंभीर असूनही त्यांना वैद्यकीय सेवाही नाकारली जात आहे. त्यामुळे बांगलादेशी हिंदू (Hindu) समुहाने आता चिन्मय कृष्ण दास (Chinmay Krishna Das) यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन लोकांना केले आहे.
( हेही वाचा : शहरातील रस्ते कामाची ACB कडे तक्रार, नार्वेकर यांची चौकशी करण्याची मागणी)
बांगलादेशातील बंगाली हिंदू अधिकार गटाचे ‘बांगलादेश शोमिलितो सनातन जागरण जोते’ (Bangladesh Shomilito Sanatan Jagran Jote) यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, चिन्मय कृष्ण प्रभू (Chinmay Krishna Das) यांची प्रकृती गंभीर असून त्यांना बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडून उपचाराच्या योग्य सुविधा उपलब्ध करून देत नाहीत. यादरम्यान त्यांना दोन वेळा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे चिन्मय कृष्ण दास यांनी लवकर बरे व्हावे याकरीता बांगलादेशातील प्रत्येक मंदिरात दि. १ जानेवारी २०२५ रोजी प्रार्थना करण्यात येणार आहे. (Chinmay Krishna Das)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community