चिपळूणमध्ये २००५ची पुनरावृत्ती! ५ हजार जण अडकले!

चिपळूण तालुक्याला पावसाच्या पाण्याने वेढले आहे. पाण्याचा प्रवाह जोरात आहे. त्यामुळे मदतकार्य करण्यासाठी चिपळूणमध्ये कुठून प्रवेश करायचा असा यक्ष प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

185

बुधवार, २१ जुलै रोजी रात्रीपासून अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस कोसळला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड या दोन तालुक्यांना अक्षरशः पावसाच्या पाण्याने वेढले आहे. अक्षरशः २००५ साली जसा महापूर आला होता, त्याहीपेक्षा जास्त वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी ५ हजार जण अडकले आहेत. त्यामुळे चिपळूण शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटापेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत.

मदतकार्य करण्यासाठी अडचणी 

चिपळूण तालुक्याला पावसाच्या पाण्याने वेढले आहे. पाण्याचा प्रवाह जोरात आहे. त्यामुळे मदतकार्य करण्यासाठी चिपळूणमध्ये कुठून प्रवेश करायचा असा यक्ष प्रश्न प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे पाण्यात अडकलेल्या नागरिकांना कोस्ट गार्ड आणि हेलिकॉप्टर पाठवण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. थोड्याच वेळात एनडीआरएफची टीम चिपळूणमध्ये दाखल होणार आहे. तसेच स्पीड बोटीही दाखल होणार आहेत.

chiplun1

(हेही वाचा: राज्यात पावसाचा कहर! कोल्हापुरात पंचगंगेला पूर, २०१९च्या महापुराच्या आठवणीने चिंता)

वाशिष्ठी, शिवनदीच्या पुराच्या पाण्याची पातळी वाढली

चिपळूण शहरातील जुना बाजार पुल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेलेअसून दिसेनासे झाले आहेत. रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे .वाशिष्टी शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे .शहरातील जुना बाजार पूल ,बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड ,चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपुर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशुराम नगर, बहादूर शेख नाका परिसरात पाणी वाढत आहे.

२००५पेक्षा वाईट परिस्थिती 

मुसळधार पावसामुळे गुरुवारी, २२ जुलै पहाटे चार वाजल्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागले आणि अवघ्या दोन तासात कंबरभर पाणी झाले. शहरालगतच्या खेर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून अनेक घरे पाण्याखाली आहेत. या घरातील काही लोक या पुरात अडकले असून त्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. बाजारपेठेत कंबरभर पाणी असून चिपळूण खेर्डीमध्ये २००५च्या महापुरापेक्षा वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय पावसाचा जोर वाढत असून पाणी पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

(हेही वाचा : पुन्हा कसारा घाटात कोसळली दरड! ‘या’ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.