शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या चित्ररथ संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ साकारण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून शिवाजी महाराज यांच्या विषयावर चित्ररथ साकारण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईतील शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनात सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने शिवराज्याभिषेकावर आधारित चित्ररथही याच संकल्पनेवर आधारीत आहे. (Republic Day 2024 )
या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली चित्ररथ संचलनात २८ राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी या दोन संकल्पनांवरती विविध राज्यांना आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यास केंद्र शासनाने कळविल होत. या पार्श्वभमीवर विविध विषयांवर केंद्र शासनास संकल्पनाचे सादरीकरण करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३५० व्या शिवराज्यभिषेकाचा महोत्सव या संकल्पनेवर आधारित सादरीकरण संरक्षण मंत्रालयास करण्यात आले होते.(Republic Day 2024)
(हेही वाचा : Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस; आंदोलनासाठी मुंबईत मैदान मिळणार का?)
या चित्ररथाची बांधणी राष्ट्रीय रंगशाला दिल्ली केंट या परिसरात करण्यात येत आहे. शुभ ॲड नागपूर या संस्थेमार्फत चित्ररथाची बांधणी करण्यात येत आहे. तर भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकामधील १६ कलाकार चमूच्या माध्यमातून चित्ररथाच्या सोबतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. देशभरातून यावेळी ३० राज्यांनी राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावा केला होता. पण विविध चाचण्यानंतर महाराष्ट्रसह देशातील १६ राज्यांच्या चित्ररथाची निवड या कार्यक्रमासाठी झाली आहे. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत भारताच्या विविध राज्यांची संस्कृती आणि वैशिष्ठये दर्शविणारे चित्ररथ सादर केले जातात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community