छत्तीसगडमधील पाथरी गावात Christian Missionaries यांच्याकडून ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणार्या वाहनांवर भगवे झेंडे लावून लोकांची दिशाभूल केली जात आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक हिंदु तरुणांनी त्याला विरोध केला.
रिक्शावर भगवा ध्वज लावून पत्रके वाटण्यात येत होती. तसेच लोकांच्या घरी येशूशी संबंधित साहित्य वाटण्यात आले. ते समोर येताच स्थानिक तरुण आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सक्रीय झाले. त्यांनी मिशनर्यांना (Christian Missionaries) जोरदार विरोध केला. त्यानंतर मिशनरी पळून गेले. या प्रकरणी राष्ट्रीय बजरंग दलाने जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
(हेही वाचा कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील Waqf Board चा ५३ ऐतिहासिक स्मारकांवर दावा)
सरकार आणणार धर्मांतरविरोधी कायदा
छत्तीसगडचे भाजपा सरकार कायदा आणून जबरदस्तीने, आमीष दाखवून किंवा फसवणूक करून धर्मांतर करणार्यांना कठोर शिक्षेची तरतूद करणार आहे. या कायद्यानुसार धर्मांतराची तक्रार प्रथम जिल्हा दंडाधिकार्यांकडे करणे आवश्यक असेल. अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रियेनुसार दोषींना शिक्षा होईल.
Join Our WhatsApp Community