Hindu : शाळेच्या बाकावर ‘जय श्री राम’ लिहिले म्हणून ख्रिस्ती शिक्षिकेने विद्यार्थ्याचा चेहरा व्हाइटनरने रंगवला; हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामुळे कारवाई 

428

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात शाळेच्या बाकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याबद्दल वर्गासमोर एका विद्यार्थ्याचा अपमान केल्याची घटना समोर आली आहे. हिंदू (Hindu) विद्यार्थी इशांत चौहान असे पीडितेचे नाव असून, त्याचा चेहरा व्हाइटनरने रंगवण्यात आला. या घटनेचा हिंदू संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला. मनीषा मसीह (मनिषा मॅसी) नावाच्या महिला शिक्षिकेवर हा आरोप लावण्यात आला आहे, तिला निलंबित करण्यात आले आहे.

सुमारे तासभर इशांत याच अवस्थेत बसून राहिला

हे प्रकरण गाझियाबादच्या मसुरी पोलीस ठाण्यातील आहे. पीडित विद्यार्थी इशांत चौहान येथील होली ट्रिनिटी चर्च स्कूलमध्ये इयत्ता सातव्या वर्गात शिकतो. सोमवारी इशांतने त्याच्या बाकावर ‘जय श्री राम’ लिहिले. ही बाब वर्गशिक्षिका मनीषा मसिह यांना समजताच त्या संतापल्या. मनीषाने इशांतच्या चेहऱ्यावर व्हाइटनर लावून त्याला त्याच अवस्थेत इतर विद्यार्थ्यांमध्ये बसवल्याचा आरोप आहे. सुमारे तासभर इशांत याच अवस्थेत बसून राहिला.

(हेही वाचा Shatabdi Express : शताब्दी एक्स्प्रेसमध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मान; प्रवाशांकडून रेल्वेचे कौतुक)

आरोपीवर कारवाईची मागणी सुरू केली

साधारण तासाभरानंतर हिंदू (Hindu) विद्यार्थी इशांतचा चेहरा थिनरने स्वच्छ करण्यात आला. थिनरच्या वापरामुळे पीडितेच्या चेहऱ्यावर जळजळ होऊ लागली. त्याच दिवशी इशांत घरी परतला तेव्हा त्याने घरच्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. काही वेळातच हिंदू संघटनांना घटनेची माहिती मिळाली. पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांसह त्यांनी शाळा गाठली आणि आरोपीवर कारवाईची मागणी सुरू केली. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच तेही घटनास्थळी पोहोचले. गदारोळ वाढत असल्याचे पाहून मनीषा मसिहने आपल्या कृत्याची कबुली दिली आणि ही चूक असल्याचे सांगत माफी मागितली.

पोलिसांत तक्रार दाखल नाही

मात्र, हिंदू संघटना मनीषा मसिह यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीवर ठाम राहिले. शेवटी, होली ट्रिनिटी चर्च स्कूलच्या व्यवस्थापक आशा डॅनियल आणि मुख्याध्यापिका मधुलिका जोसेफ यांनी 4 डिसेंबर रोजीच मनीषा मसिहच्या नोकरीवरून काढून टाकल्याबद्दल माहिती दिली. बडतर्फीचे कारण पीडितेचे कुटुंबीय आणि नगर प्रशासनाकडून शिक्षकाविरुद्ध गंभीर तक्रार असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी सध्या कोणत्याही पक्षाने पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.