ब्रिटनभोवती मुसलमानांचा विळखा, नव्या जनगणनेत धक्कादायक आकडेवारी समोर…

97
मुसलमानांची वाढती लोकसंख्या हा भारतासाठी जटील समस्या बनली आहे. भारतात मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील अनेक राज्यांत मुसलमानबहुल शहरे, गावे बनली आहेत. त्या भागात मात्र मुसलमानेतर विशेष म्हणजे हिंदू असुरक्षित बनले आहेत. आता हीच समस्या ब्रिटनमध्ये उद्भवण्याची शक्यता आहे. नव्या जनगणनेनुसार ब्रिटनमध्ये मुसलमानांची लोकसंख्या तब्बल ४४ टक्क्यांनी वाढली आहे.

मुसलमान १० वर्षांत ४४ टक्क्यांनी वाढले 

नव्या जनगणनेनुसार ब्रिटनमध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे आणि मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे. मंगळवारी, २९ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध झालेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार, इंग्लंड आणि वेल्समधील ख्रिश्चनांची लोकसंख्या प्रथमच एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून कमी झाली आहे. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या ताज्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार, ब्रिटनमधील मुस्लिम लोकसंख्या एका दशकात 44 टक्क्यांनी वाढली आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 6.5 टक्के म्हणजे 3.9 दशलक्ष (39 लाख) लोक मुसलमान आहेत. ब्रिटनमधील ख्रिश्चनांच्या खालोखाल ‘नो रिलिजन’ म्हणजेच कोणताही धर्म नसलेली लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.

उर्दू बोलणारे २ लाख ७० हजार 

या अहवालानुसार, ब्रिटनमधील ख्रिश्चनांच्या लोकसंख्येमध्ये 13.1 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचवेळी मुसलमानांची लोकसंख्या 4.9 टक्क्यांवरून 6.5 टक्के झाली आहे. हे पहिल्यांदाच घडले आहे. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सनुसार, इंग्लंड आणि वेल्समधील ख्रिश्चन लोकसंख्या 46.2 टक्क्यांवर घसरली आहे. या प्रकरणी आर्चबिशप स्टीफन कॉट्रेल म्हणतात की, ब्रिटनमधील ख्रिश्चनांची लोकसंख्या झपाट्याने कमी होणे हे खरोखरच धक्कादायक आहे. 2021 च्या जनगणनेत असे आढळून आले आहे की, यूकेमध्ये जवळपास 10 टक्के कुटुंबांमध्ये दोन वेगवेगळ्या जातींचे सदस्य आहेत. यामध्ये ८.७ टक्के वाढ झाली आहे. यासोबतच पंजाबी आणि उर्दू अनुक्रमे 2,91,000 आणि 2,70,000 लोक बोलत असल्याचेही समोर आले आहे. पंजाबी आणि उर्दू यूकेमध्ये बोलल्या जाणार्‍या 5व्या आणि 6व्या सर्वात सामान्य भाषा बनल्या आहेत. ब्रिटनमध्ये ‘कोणताही धर्म नाही’ म्हणजेच कोणताही धर्म नसलेल्यांची लोकसंख्येचा २.२२ कोटी म्हणजेच ३७.२ टक्के आहे. मुस्लिमांची लोकसंख्या ३९ लाख झाली आहे. त्यानंतर हिंदूंची लोकसंख्या १० लाख आहे. शीखांची लोकसंख्या ५,२४,००० आहे. बौद्ध धर्माची लोकसंख्या २.७३ लाखांवरून २.७१ लाख झाली आहे. ज्यू येथे सर्वात कमी आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.