जोगेश्वरी (Jogeshwari) येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्याचा स्लॅब कोसळून पाच जण जखमी झाले आहेत. चुन्नीलाल मारवाडी चाळ, गुंफा दर्शन इमारतीजवळ, ब्रूक हेवनच्या मागे, मजास वाडी, जोगेश्वरी पूर्व येथे ही घटना घडली. (Jogeshwari)
( हेही वाचा : तो दिवस दूर नाही जेव्हा भारत गरिबीमुक्त होईल; PM Narendra Modi यांचा विश्वास)
मुंबई महापालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, जी+१ इमारतीच्या वरच्या मजल्याचा काही भाग कोसळला. ज्यात ५ जण जखमी झाले असून त्यातील चौघांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. या दुर्घटनेत ललिना विक्रम भाटी (Lalina Bhati) (२६), विक्रम भाटी (२८), नितीन म्हामुणकर (Nitin Mhamunkar) (४२), फॅन्सी भाटी (३५), लतिका भाटी (११) अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान या दुर्घटनेत ललिना विक्रम भाटी गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांच्यावर अद्याप उपचार सुरु आहेत, अशी माहिती एएमओ, ट्रॉमा हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे. (Jogeshwari)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community