होळीचे नवी मुंबईकरांना मिळणार ‘हे’ मोठे गिफ्ट!

129

होळी सणाला नवी मुंबईकरांना सिडकोने मोठे गिफ्ट दिले आहे. ऐन होळीत नवी मुंबईकरांना स्वत:ची घर मिळत असल्याने, त्यांच्या आयुष्यात नवे रंग भरले जाणार आहेत. याआधी 26 जानेनारी रोजी 5 हजार 700 घरांची सोडत काढण्यात आली आहे. यात आता 1 हजार 900 घरांची भर पडणार आहे. त्यामुळे 6 हजार 500 घरे लोकांना उपलब्ध होणार आहेत.

‘इतकी’ घरे उपलब्ध

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरता द्रोणागिरी येथे 181, घणसोली येथे 12, कळंबोली येथे 48, खारघर येथे 129 आणि तळोजा येथे 1 हजार 535, अशा एकूण 1 हजार 905 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गाकरिता द्रोणागिरी येथील 241, कळंबोली येथील 22, खारघर येथील 88 आणि तळोजा येथील 4 हजार 252, अशा एकूण 4 हजार 603 सदनिका उपलब्ध आहेत. याप्रमाणे, एकूण 6 हजार 508 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवी मुंबई , पनवेल मधील विविध नोड मध्ये ही घरे काढण्यात आली आहेत. यामध्ये द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, खारघर आणि तळोजा नोडमधील सदनिकांचा सहभाग आहे.

( हेही वाचा: लवकरच मुंबईतील ‘या’ झोपड्या हटवल्या जाणार! )

तर करु शकता अर्ज

पत्रकार, दिव्यांग, माजी सैनिक, राज्य शासन कर्मचारी, नवी मुंबई प्रकल्पबाधित, माथाडी कामगार, धार्मिक अल्पसंख्य या प्रवर्गांकरता आरक्षित सदनिका पहिल्या सोडतीनंतर शिल्लक राहिल्यास, दुसरी सोडत काढण्यात येऊन या सदनिकांचे वाटप या प्रवर्गांतील तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील उर्वरित पात्र अर्जदारांना करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.