सिडकोने दिवाळीनिमित्त नागरिकांना मोठे गिफ्ट दिले आहे. सिडकोने ७ हजार ८४९ परवडणाऱ्या घरांच्या लॉटरीची घोषणा केली आहे. ही सर्व घरे नवी मुंबई विमानतळाच्या परिसराजवळच आहेत. सिडकोकडून जाहीर करण्याच आलेल्या लॉटरीचा फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना होणार आहे.
( हेही वाचा : मुंबईतील ‘या’ ४ स्थानकांचा होणार ३६ महिन्यांत कायापालट)
या घरांच्या लॉटरीसाठी नोंदणी प्रक्रिया मंगळवार २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांचे नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
घरे कोणत्या भागात?
सिडकोने ७ हजारर ८४९ घरांच्या लॉटरीची घोषणा केली आहे. ही घरे नवी मुंबईतील उलवे नोडमधील खारकोपर पूर्व २, ए २ बी आणि पी ३, बामणडोंगरी येथील आहेत. ही घरे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरूळ- उरण रेल्वे मार्गाजवळ आहेत.
गृहसंकुलाची वैशिष्ट्ये काय आहेत?
सिडकोने दिलेल्या माहितीनुसार, नव्याने उभारण्यात आलेली घरे उच्च दर्जाच्या सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी आहेत. या गृहसंकुलाच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी सुविधा नागरिकांना मिळतील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उत्पन्न मर्यादा ही ३ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय त्यांना २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी या सदनिका उपलब्ध असणार आहेत.
Join Our WhatsApp Community