नवी मुंबईत (Navi Mumbai) सामान्य नागरिकांचे आपल्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्नं पूर्ण होणार आहे. मुंबई, नवी-मुंबईत खासगी घरांच्या किंमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना घर घेणं शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण लॉटरीची (CIDCO Lottery 2024) वाट पाहत असतात. सिडकोनं ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेच्या (Majhya Pasantiche CIDCO che ghar) 26000 घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत. सिडकोनं “माझे पसंतीचे सिडकोचे घर” या 26000 घरांच्या महागृहनिर्माण योजनेच्या (Mahagrihnirman Yojana) ऑनलाइन अर्ज नोंदणी तब्बल तीन वेळा मुदतवाढ दिला होती. या योजनेत अर्ज दाखल करण्याची अंतिम (CIDCO Lottery Last Date) मुदत 10 जानेवारी 2025 पर्यंत आली आहे. (CIDCO Lottery 2024)
काय असेल किंमत ?
दरम्यान, सामान्य नागरिकांना परवडेल अशा किमतीमध्ये सिडकोतर्फे ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेच्या योजनेंतर्गत 26000 सदनिका किमती जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सिडकोनं ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेतील 26000 घरांच्या किमती अखेर जाहीर केल्या आहेत. EWS अर्थात आर्थिक दुर्बल घटक गटासाठी 25 ते 48 लाखांपर्यंत घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. तर, अत्यल्प (LIG) गटासाठी घरांच्या किमती 34 लाखांपासून 97 लाखांपर्यंत आहेत. ‘माझे पसंतीचे सिडको घर’ योजनेंतर्गत सिडकोने 26 हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. विशेष म्हणजे, अर्ज नोंदणीसाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली तथापि, घरांच्या किमती गुलदस्त्यातच ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य ग्राहक किमती जाहीर होईपर्यंत ते वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत होते
आर्थिक दुर्बल घटक (EWS) गटात अर्ज करणाऱ्यांसाठी म्हणजे ज्यांचं वार्षिक आर्थिक उत्पन्न सहा लाखांपर्यत आहे त्या गटासाठी घरांच्या किमती या 25 लाखापासून 48 लाखांपर्यंत ठेवण्यात आल्या आहेत. तर अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) आर्थिक वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त आहे या गटामध्ये घराच्या किमती या 40 लाखांपासून ते 97 लाखांपर्यंत ठेवण्यात आले आहेत.
गट EWS ( आर्थिक दुर्बल घटक )
तळोजा सेक्टर 28 – 25.1 लाख
तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख
खारघर बस डेपो – 48. 3 लाख
बामणडोंगरी -31. 9 लाख
खारकोपर 2A, 2B -38.6 लाख
कळंबोली बस डेपो – 41.9 लाख
अल्प उत्पन्न गट एलआयजी –
पनवेल बस टर्मिनस – 45.1 लाख
खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख
तळोजा सेक्टर 37 – 34.2 लाख 46.4 लाख
मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख खारकोपर ईस्ट – 40.3 लाख
वाशी ट्रक टर्मिनल – 74.1 लाख
खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख
(हेही वाचा – Mahakumbh 2025 साठी पोलिसांचे सायबर पेट्रोलिंग सुरू; 78 संशयास्पद वेबसाइट आणि 4 जणांना अटक)
ऑनलाईन नोंदणीची शेवटची संधी
सिडकोनं माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेत अर्ज सादर करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे. या योजनेतील घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 जानेवारी 2025 आहे. सिडकोनं घरांच्या किंमती जाहीर केल्यानंतर दोन दिवसात किती अर्ज सादर होतात हे पाहावं लागेल.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community