देशाची आर्थिक राजधानी (financial capital) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत हक्काची घरे असावीत अशी सर्व सामान्य नागरिकांची इच्छा असते. त्यासाठी सिडको सारखे महामंडळ सवलतीच्या दरात घरं उपलब्ध करत असतात. यासाठी सिडकोने (CIDCO) दीड महिन्यांपूर्वी २६ हजार घरांची महायोजना जाहीर केली आहे. विविध नोडमध्ये असलेल्या या घरांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, सिडकोने या घरांच्या किमती गुलदस्त्यात ठेवल्याने ग्राहकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. (CIDCO Lottery 2024)
(हेही वाचा – Paramilitary force मध्ये फक्त ३.२९ टक्के महिला; ‘सीआरपीएफ’मध्ये केवळ २.१७ टक्के महिलांची नियुक्ती)
विशेष म्हणजे आतापर्यंत ९५ हजार ग्राहकांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी केली आहे. अर्ज नोंदणीसाठी ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अर्जाचा आकडा लाखांच्या पलीकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे, असे असतानाही घरांच्या किमती गुलदस्त्यात ठेवल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिडकोकडून शहराच्या विविध नोडमधील २७ ठिकाणी ६७ हजार घरे बांधली जात आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची (Maharera) परवानगी प्राप्त झाली असून, त्यांचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. यातील २६ हजार घरांची योजना दि. ११ ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. सध्या ग्राहकांची पसंती खांदेश्वर, मानसरोवर तसेच खारकोपर आणि बामणडोंगरी, वाशी आणि खारघर विभागातील घरांचा समावेश आहे. यादरम्यान राज्यात निवडणुकीचा माहोल असल्यामुळे ग्राहकांना घर घेण्यासाठी अधिक संधी देण्याच्या उद्देशाने अर्ज नोंदणीसाठी दि. ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. असे असले तरी घरांच्या किमतीवरून (CIDCO House Prices) ग्राहकांत संभ्रम पाहण्यास मिळत आहे.
हेही पाहा –