CIDCO lottery च्या घरांचे दर होणार कमी; अध्यक्ष संजय शिरसाट यांचे संकेत

164

मुंबई तसेच उपनगरांत आपल्या हक्काचे घर असावे असे प्रत्येक मुंबईकरांचे स्वप्न असते. त्यासाठी ते जीवाचे रान करतात. यासंबंधी त्यांची नजर प्रामुख्याने म्हाडा (MHADA) तसेच सिडको (CIDCO house rate reduced) यांच्याकडून बांधल्या जाणाऱ्या घरांकडे असते. पण गत काही वर्षांपासून सिडकोची घरे (CIDCO house rates)  महाग असल्याची ओरड सर्वसामान्यांकडून सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी आगामी काळात सिडकोची घरे स्वस्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत. (CIDCO lottery)

मायानगरी मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला जावू नये यासाठी, सिडकोच्या काही अटी आणि नियम शिथील करणार असल्याचेही शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यांच्या या निर्णयाचा लाभ मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांना होणार असल्याचा दावा शिरसाट यांनी  केला आहे. तसेच आतापर्यंत एखाद्या कुटुंबाने यापूर्वी सिडकोचे घर विकत घेतले असेल तर त्याला दुसरे घर घेता येत नव्हते. पण आता यासंबंधीच्या अटीशर्थीत बदल केला जाईल. यामुळे एका कुटुंबाला सिडकोचे घर एकाहून अधिक वेळा खरेदी करता येईल.

(हेही वाचा – Best Bus Accident : पाच वर्षांत 834 अपघात, 88 नागरिकांचा मृत्यू; 42.40 कोटींची नुकसान भरपाई)

याशिवाय सिडकोच्या घरांच्या खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्राची अटही काढून टाकण्याचा आमचा विचार आहे. मुंबईत गत अनेक वर्षांपासून राहणाऱ्या व्यक्तीला सिडकोचे घर घेता यावे हा यामागील उद्देश आहे. संजय शिरसाट यांनी यावेळी सिडकोच्या लॉटरी पद्धतीत मुदतवाढ देण्याचेही सूतोवाच केले.

(हेही वाचा –पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार तीन Warship चे राष्ट्रार्पण)

उल्लेखनीय बाब म्हणजे सिडकोतर्फे नवी मुंबई परिसरात तब्बल 67 हजार घरांचे बांधकाम केले जाणार आहे. त्यातील 26 हजार घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी माझ्या पसंतीचे सिडको घर योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत घरे खरेदी करण्यासाठी नोंदणी करण्याची मुदत गत 10 जानेवारी रोजी संपुष्टात आली आहे. आता पुढील प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.