मुंबईचा विकास कसा व्हावा, पाठवा विकासकामांच्या सूचना महापालिकेला २८ जानेवारीपर्यंत

मुंबईचा विकास हा आजवर महापालिका प्रशासनाचे अधिकारी आणि लोकांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांच्या सूचना आणि शिफारशींनुसार होत असले तरी यंदा न भूतो न भविष्यती असा निर्णय आता महापालिकेने घेतला आहे. महापालिकेतील नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात आल्याने प्रशासकांची राजवट असल्याने यंदाचा अर्थसंकल्प हा जनतेच्या स्वप्नातील विकासकामे जाणून घेऊन त्याप्रमाणे सूचना आणि शिफारशी जाणून घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे मुंबईचा विकास कसा व्हावा याबाबत जर आपल्याकडे विकासकामांच्या सूचना किंवा शिफारशी असल्यास त्या तात्काळ मुंबई महापालिकेला २८ जानेवारी २०२३ पूर्वी [email protected] या ई-मेलवर किंवा महापालिका मुख्यालयातील लेखापाल विभागाकडे पत्राद्वारे पाठवू शकतात. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षासाठी जनतेच्या मनातील विकासकामे स्वीकारुन त्याप्रमाणे निधीची तरतूद केली जावू शकते. त्यामुळे जनतेच्या मनातील मुंबई प्रत्यक्षात साकारण्यात आपलाही हातभार लागला जाण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईकरांना देणार ३८ हजार कोटींचे गिफ्ट)

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये लोकसहभाग असावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सूचना [email protected] या ई-मेलवर २८ जानेवारी २०२३ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईच्या नागरिकांना असे कळविण्यात येते की, सन २०२३-२४ या वर्षाकरीता मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्याचे काम सुरु आहे. हा अर्थसंकल्पीय अंदाज ५ फेब्रुवारी, २०२३ पूर्वी सादर करण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने, लोकसहभागाच्या दृष्टीने मुंबईतील नागरिकांना महापालिकेने आवाहन करत,ज्यांना अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने काही सूचना करावयाच्या असतील तर त्यांनी २८ जानेवारी, २०२३ पर्यंत ई-मेल आयडी [email protected] यावर सूचना पाठवाव्यात.

तसेच ज्या नागरिकांना लेखी सूचना पाठवावयाच्या असतील तर त्यांनी २८ जानेवारी, २०२३ पर्यंत प्रमुख लेखापाल (वित्त) यांचे कार्यालय, चौथा मजला, विस्तारीत इमारत, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महानगरपालिका मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०० ००१ या पत्यावर पाठवण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here