मुंबई विशेष प्रतिनिधी
BMC : भुलेश्वरमधील सुवर्णकरांच्या कारखान्यांमुळे (Bhuleshwar gold workshop) प्रदुषण होत असल्याने रहिवाशी वस्तींमधून हे कारखाने हटवण्याची मागणी भुलेश्वर रेसिडेन्ट असोसिएशनच्या (Bhuleshwar Resident Association) करण्यात येत असतानाच या असोशिएशनच्या प्रतिनिधींसह सुवर्णकारांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत महापालिका आयुक्तांनी बैठक घेतली. या या बैठकीत रहिवासी जागेत आरोग्य आणि सुरक्षेच्या अनुषंगाने मुद्दे मांडत रहिवाशांनी रहिवासी भागात चालणारे सुवर्णकार उद्योग हे औद्योगिक परिसरात स्थलांतरित करण्याची मागणी जोरदार केली केली. राज्य शासनाच्या नगरविकास खात्याच्या (Urban Development Account) निर्देशानुसार महापालिका आयुक्तांनी या दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतले असून याचा सविस्तर अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. (BMC)
मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी’ विभाग अंतर्गत भुलेश्वर तथा काळबादेवी परिसरात सुवर्णकारांना त्यांच्या व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने रहिवासी संघटना आणि सुवर्णकार संघटना यांची संयुक्त बैठक मुंबई महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी २७ मार्च २०२५ रोजी पार पडली. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशांनुसार ही बैठक पार पडली.
मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, ‘सी’ विभागाचे सहायक आयुक्त विष्णू विधाते तसेच सर्व संबंधित अधिकारी यांच्यासोबतच सुवर्णकार संघटनांचे विविध प्रतिनिधी आणि रहिवासी संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी रहिवासी संघटना तसेच सुवर्णकार संघटना यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशान्वये याप्रकरणी दोन्ही बाजू ऐकून घेण्यासाठी ही समन्वय बैठक घेण्यात आल्याचे गगराणी यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
(हेही वाचा – रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin भारत दौऱ्यावर येणार)
या बैठकीत भुलेश्वर रेसिडेन्ट असोसिएशनच्या प्रतिनिधींनी रहिवासी जागेत आरोग्य आणि सुरक्षेच्या अनुषंगाने मुद्दे मांडले. तसेच रहिवासी भागात चालणारे सुवर्णकार उद्योग हे औद्योगिक परिसरात स्थलांतरित करण्याची मागणी केली. सुवर्णकार संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यवसाय चालविताना सुरक्षा आणि पर्यावरणीयदृष्ट्या करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबतची माहिती दिली. दोन्ही बाजुंचे सविस्तर म्हणणे ऐकून घेतले असून त्याचा सविस्तर अहवाल महाराष्ट्र शासनाकडे सादर करण्यात येईल, असे बैठकीच्या समारोपात उपआयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community