राजधानी दिल्लीची हवा दिवसेंदिवस विषारी होत आहे. कारण दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर राजधानीच्या जवळील सर्वच राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात पराली जाळणे सुरु करतात. यामुळे दिल्लीकर प्रदूषणाच्या विळख्यात सापडतात. तसेच त्यांचे आरोग्य देखील धोक्यात येते. प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी केजरीवाल सरकारचे प्रयत्न पुरेसे नाहीत. एकूणच राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांनी नुकतीच एका बैठक आयोजित केली होती. मात्र फारसे यश मिळाले नाही. हवा गुणवत्ता आज २०० ते ३०० च्या मध्ये नमूद करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतोय. (Delhi Air Pollution)
राजधानी नवी दिल्लीचे पर्यावरण मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते गोपाल राय यांनी विविध विभागांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी दिल्लीच्या हवेतील वाढलेल्या प्रदूषणाच्या पातळीबद्दल चर्चा केली. गोपाल राय यांनी यांनी नवी दिल्लीसाठी ‘रेड लाईट ऑन, इंजिन ऑफ’ हे धोरण जाहीर केलं आहे. हे धोरण २६ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. याशिवाय दुचाकींमुळं देखील मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून दुचाकीचालकांनी त्यांच्या वाहनांची पीयूसी चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन केलं आहे. दिल्ली आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये पालापाचोळा जाळण्यामुळे वायू प्रदूषणात वाढ होणं हे एकमेव कारण नाही असं केंद्राच्या वतीनं कोर्टात सांगण्यात आलं होतं. कारण याचा प्रदूषणातील वाटा केवळ १० टक्के इतकाच आहे. सध्या दिल्लीत धुळीनं होणारं प्रदूषण सर्वाधिक आहे. (Delhi Air Pollution)
दिल्ली सरकारकडून हवेतील धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणकोणती पावलं उचलली गेली याची माहिती कोर्टात देण्यात आली होती. तरी देखील दिल्लीकरांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका होताना दिसून येत नाही आहे. राजधानी दिल्लीची हवा दिवसेंदिवस विषारी होत चालली आहे. हवेतील प्रदूषणामुळे आयुर्मान कमी होणाऱ्या जगातील पहिल्या सहा देशांमध्ये भारताचा क्रमांक असणे स्वाभाविक आहे. भारतातील सर्वात अधिक हवेचे प्रदूषण राजधानी दिल्लीत होत असून, त्यामुळे दिल्लीकरांचे आयुर्मान सरासरी ११.९ वर्षांनी कमी होत असल्याचा निष्कर्ष अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिटय़ूटच्या अहवालात नुकताच जाहीर झाला आहे. भारतातील नागरिकांचे सरासरी आयुष्य या प्रदूषणामुळे ५.३ वर्षांनी कमी होत असल्याचा निष्कर्षही या अहवालात नमूद आहे. याचा अर्थ आज दिल्ली जात्यात असेल, तर देशातील अन्य शहरांमधील नागरिक सुपात आहेत आणि नजीकच्या भविष्यात त्यांचेही आयुष्य या प्रदूषणाच्या संकटामुळे कमी होत जाणार आहे. (Delhi Air Pollution)
(हेही वाचा – Agriculture News : १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ)
ही भयानकता एवढी मोठी असूनही आपला शहरांकडे निर्ढावलेपणाने पाहण्याचा धोका अधिक दूरगामी परिणाम करणारा, म्हणून गंभीर आहे. सारा देश ‘शहराकडे चला’ या धोरणात बुडाला असल्याने वाढत्या नागरीकरणाने ही शहरे हळूहळू त्यांच्या सर्व मर्यादा ओलांडून ताण सहन करू लागली आहेत. ४० टक्क्यांहून अधिक नागरीकरणाने शहरे गजबजत चालली आहेत. तेथील मूलभूत सुविधा मात्र पूर्वीइतक्याच राहिल्या असल्याने, जगण्यास अन्य पर्याय नसलेले हतबल नागरिक जीव मुठीत धरून या शहरांमध्ये आपले जीवन अक्षरश: कंठत असतात. वाढत्या वाहनसंख्येमुळे त्यात भरच पडते. प्रचंड प्रमाणातील बांधकामांमुळे शहरांच्या हवेतील अतिसूक्ष्म धूलिकण अशा प्रदूषणास कारणीभूत ठरतात. हवेतील धूलिकणांच्या प्रदूषणाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या मानकानुसार भारतातील कोटय़वधी नागरिक प्रदूषित वातावरणात राहतात. (Delhi Air Pollution)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community