नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (सीएए, CAA) आज, बुधवारी नवी दिल्ली येथे 14 निर्वासितांना नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी त्यांना ही प्रमाणपत्रे दिली. यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान (Afghanistan) आणि बांगलादेशातील (Bangladesh) बिगर मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली.
(हेही वाचा – Narendra Modi : काँग्रेस देशात आरक्षणाची लूट करू पहात आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात)
Citizenship Certificates were physically handed over to 14 applicants in Delhi today. Digitally signed Certificates are being issued to many other applicants through email: Ministry of Home Affairs pic.twitter.com/0qCN999FJy
— ANI (@ANI) May 15, 2024
डिसेंबर 2019 मध्ये लागू झाला कायदा
बांगलादेश, पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी डिसेंबर 2019 मध्ये सीएए लागू करण्यात आला होता, जे निर्वासित 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी भारतात आले होते. नागरिकत्व कायदा नैसर्गिकीकरणाद्वारे नागरिकत्व प्रदान करतो. अर्जदाराने गेल्या 12 महिन्यांत आणि गेल्या 14 वर्षांपैकी 11 महिने भारतात वास्तव्य केलेले असावे.
या कायद्यांतर्गत अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन या 6 धर्माच्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करतो. या नागरिकांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकांची नोंदणी रद्द केली जाऊ शकते, अशी तरतूद कायद्यात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community