महानगर गॅसचे सिटी गेट स्टेशन सावरोली येथे कार्यान्वित; गॅस वितरण नेटवर्कचा विस्तार

146

महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ह्या भारतातील एका मोठ्या नागरी गॅस वितरण कंपनीने १६ फेब्रुवारी २०२३ रोजी रायगड जिल्ह्यातील खालापुर येथील सावरोली येथे तिच्या पाचव्या सिटी गेट स्टेशनच्या (सीजीएस) कायमस्वरूपी आणि उच्चक्षमतेच्या मंचाचा शुभारंभ करून आपल्या गॅस वितरण नेटवर्कचा विस्तार केला आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एमजीएलचे हे पहिले सीजीएस आहे.

सावरोली येथील सीजीएस, गेलच्या दहेज-उरण गॅस ट्रान्समिशन पाइपलाइनला (डीयुपीएल) आणि नॅशनल गॅस ट्रान्समिशन सिस्टीमला थेट कनेक्टिव्हिटी प्राप्त करून देईल. ह्यामुळे एमजीएलच्या सुसंकलित गॅस पुरवठा नेटवर्कला होणाऱ्या गॅस पुरवठ्याच्या सुरक्षेत भर पडली आहे, जिच्यामुळे खोपोली आणि सभोवतालच्या भागातील एमजीएलच्या कंप्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) ग्राहकांना फायदा होणार आहे.

ह्याविषयी बोलताना महानगर गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आशु सिंघल म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या परिचालनांत वाढ करून आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा पुरवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. सावरोली येथील पाचव्या सिटी गेट स्टेशनची सुरुवात ह्याच कटिबद्धतेला पुढे नेत आहे. ह्यामुळे आमच्या नेटवर्कच्या क्षेत्रांमधील आमची व्याप्ती वाढेलच, पण त्याबरोबरच आमच्या ग्राहकांना त्याचे प्रत्यक्ष लाभ उपभोगायला मिळणार आहेत.’’

‘‘सावरोली येथे आमचे सीजीएस प्रस्थापित करून रायगडमध्ये पूर्णपणे संचालित होत असल्याचे यश आपण आज साजरे करत असलो, तरी ही फक्त पहिली पायरी आहे. आमच्या कार्यक्षेत्रात नैसर्गिक वायुची उपलब्धता आणखी वाढवण्याच्या आणि रायगडमध्ये आणखी सीजीएस सुरु करून आमचे वितरणाचे जाळे अधिक वाढवण्याच्या दिशेने आम्ही मेहनत घेत आहोत’ असे ते म्हणाले. खोपोली व जवळपासच्या क्षेत्रांमधील सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांना सावरोली येथे सुरु झालेल्या सीजीएसचा लाभ होणे अपेक्षित आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.