City Street Vendors Committee Election : गाळेधारक हे फेरीवाले कसे, फेरीवाल्यांकडूनच उपस्थित केला जातोय सवाल

321
City Street Vendors Committee Election : गाळेधारक हे फेरीवाले कसे, फेरीवाल्यांकडूनच उपस्थित केला जातोय सवाल
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत गठीत करण्यात येणाऱ्या नगर पथविक्रेता समितीवर सदस्य निवड करण्यासाठी येत्या २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी २३७ उमेदवार रिंगणात उभे आहेत. या उमेदवारांपैकी बहुतांशी उमेदवारांचे स्वत:च्या नावे दुकान अथवा गाळे असून गाळेधारक असलेलेच उमेदवार उभे राहिल्याने ही उमेदवार फेरीवाला (hawkers) कसे असा सवाल फेरीवाल्यांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांच्या अर्जांची पुन्हा छाननी करून फेरीवाले असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज पात्र केले जावे अशी मागणी होत आहे.

केंद्र शासनाच्या पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम-२०१४ अंतर्गत महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम-२०१६ मधील तरतुदींच्या अनुषंगाने नगर पथविक्रेता समिती गठीत करण्यात येत आहे. मुंबईत १ शिखर समिती आणि ७ परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (७ समिती) एकूण ८ समित्यांसाठी निवडणूक होणार आहे. मुंबईमध्ये तब्बल १० हजार ३३० परवाना धारक फेरीवाले असून २०१४च्या सर्वेमध्ये अर्ज केलेल्या ९९ हजार अर्जदारांपैंकी सुमारे २२ हजार ४८ फेरीवाले हे मतदानास पात्र ठरले आहे. त्यामुळे मुंबईतील नोंदणीकृत नगर फेरीवाला मतदारांची एकूण संख्या ३२ हजार ४१५ एवढी आहे. (City Street Vendors Committee Election)

(हेही वाचा – Injured Govinda : गोविंदा आला रे आला… मुंबईत दहीहंडी उत्सवात ६३ गोविंदा जखमी)

नगर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीसाठी फेरीवाल्यांमधून (hawkers) तब्बल २३७ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले असून येत्या २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या समितीच्या निवडणुकीसाठी २३७ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. तर १७ जागांवर प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने १७ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे, तर एकूण दहा जागांवर एकही अर्ज प्राप्त न झाल्याने या दहा जागा निवडणूक अभावी रिक्त राहणार असल्याने जाहीर करण्यात आले आहे.

परिमंडळ दोन मधून राजकुमार जगदीश् प्रसाद दुबे अर्थात सुरेश दुबे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. परंतु दुबे यांच्या नावे हॉकर्स प्लाझा आणि अन्य ठिकाणी गाळे असून ते होलसेल कपड्याचे व्यापारी आहेत. त्यामुळे हॉकर्स प्लाझामध्ये जर त्यांना गाळा दिला असेल तर आणि त्यांच्या नावे जर गाळा असेल तर ते फेरीवाला (hawkers) कसे? त्यांना फेरीवाला म्हणून पात्र कसे करून घेतले असा सवाल फेरीवाल्यांकडूनच केला जात आहे. आधारस्तंभ एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सतीश थोरात यांनी याबाबत आक्षेप नोंदवत ज्यांच्या नावावर गाळे आहेत त्यांना महापालिकेने पात्र ठरवले आणि जे वर्षांनुवर्षे फेरीचा व्यवसाय करतात त्यांना महापालिकेने अपात्र ठरवले असे का असा सवाल केला. परिमंडळ २मधून नगर पथविक्रेता समिती सदस्य करता निवडणूक रिंगणात उतरलेले राजकुमार दुबे यांच्या नावे हॉकर्स प्लाझामध्येच गाळे आहेत. तर मग ते फेरीवाले कसे असा सवाल करत थोरात यांनी हा प्रकार दादरमध्येच नाही तर अन्य ठिकाणीही आहेत. (City Street Vendors Committee Election)

(हेही वाचा – Byculla Vidhan Sabha : उबाठा सोबत काँग्रेसचाही डोळा ‘या’ मतदारसंघावर)

उमेदवारांकडून हमी पत्र लिहून घेताना आपण फेरीच्या व्यवसायाशिवाय अन्य कुठल्याही व्यवसायावर निर्भर नाहीत असे नमुद केले आहे. म्हणजे फेरीचा व्यवसाय हाच उदरनिर्वाहाचे साधन आहे, असे हमी पत्र जर लिहून घेतो तर मग फेरीवाला व्यवसाय करणारीच व्यक्ती उमेदवार म्हणून पात्र ठरायला हवी. नाही तर फेरीच्या व्यवसायाची व्याख्या प्रशासनाने बदलली आहे का हे स्पष्ट करावे. दुबे हे केवळ फेरीच्या व्यवसायावर निर्भर नसून त्यांचे स्वत:चे गाळे असल्याने सध्या होत असलेल्या कारवाईचा फरक त्यांना पडत नाही. पण आम्हाला महापालिका आणि पोलिसांच्या कारवाईचा एवढा फटका बसतोय की मागील काही महिन्यापासून व्यवसायही करता येत नाही.

महापालिकेने रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर पर्यंतच्या अंतरावर कारवाई करून स्टेशन परिसर जरुर मुक्त करावे, परंतु दीडशेच्या पुढे अगदी एन सी केळकर मार्गापर्यंत ही कारवाई केली जात असल्याने जे मराठी फेरीवाले आहेत, त्यांची तर उपासमारच होत आहे. त्यामुळे आमच्या फेरीवाल्यांचे दु:ख जाणणारा उमेदवार असायला हवा आणि नियमाबाह्य उमेदवार असेल तर मग महापालिकेने त्यांना पात्र कसे करून घेतले. त्यामुळे प्रत्येक उमेदवारांच्या अर्जांची पुन्हा छाननी व्हायला हवी अशी मागणीही थोरात यांनी केली आहे. (City Street Vendors Committee Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.