नाशिकमध्ये सिटी लिंक बसच्या चालकांनी अचानक काम बंद आंदोलन पुकारले होते. गेल्या तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले होते. वेळेवर पगार न मिळाल्याने या चालकांनी वेळेवर पगार देण्याची मागणी करत कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मात्र आता हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. हे आंदोलन मागे घेण्यात आल्याने नाशिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
(हेही वाचा – दगडूशेठ मंदिरात निनादले ‘ॐ नमस्ते गणपतये…’ चे सूर, तब्बल ३१ हजार महिलांचा सहभाग)
अनेक मागण्यांसाठी पुकारले आंदोलन
सिटी लिंक बसच्या चालकांच्या पगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे पगार वेळेत झाले नाही. त्यामुळे अखेर सिटी लिंक बसचे कर्मचारी आक्रमक झाले असून वेळेवर पगार देण्याची मागणी चालकांनी केली आहे. वेळेवर पगार होत नसल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काळात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र आता प्रशासनाकडून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा सिटी लिंक बस रस्त्यावर धावू लागली आहे.
सिटी लिंक बसची सेवा ठप्प झाल्याने काही काळ नाशिकरांचे हाल झाले आहे. वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे पाहायला मिळाले होते. याची नाशिक शहर प्रशासनाकडून तातडीने दखल घेत कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले या अश्वासनानंतर अखेर हा संप मागे घेण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community