मी या कोर्टाचा इनचार्ज आहे; CJI Chandrachud आणि वकील यांच्यात भर सुनावणीत खडाजंगी

515
मी या कोर्टाचा इनचार्ज आहे; CJI Chandrachud आणि वकील यांच्यात भर सुनावणीत खडाजंगी
मी या कोर्टाचा इनचार्ज आहे; CJI Chandrachud आणि वकील यांच्यात भर सुनावणीत खडाजंगी

सर्वोच्च न्यायालयात मंगळवार, २३ जुलै रोजी NEET-UG परीक्षेबाबत सुनावणी चालू असतांना सरन्यायाधीश आणि वकील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. नीट परीक्षेसंदर्भातील सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील हुडा हे युक्तीवाद करत होते. त्या वेळी त्यांना मध्येच थांबवून वकील मॅथ्यूज नेदुमपरा यांनी ‘मला काहीतरी बोलायचं आहे’, असे म्हणून हुडा यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सरन्यायाधीश आणि वकील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून वकिलांना बाहेर काढण्याचा आदेश दिला.

(हेही वाचा – Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमानाचा टेक ऑफ करताना भीषण अपघात; १७ जणांचा मृत्यू झाल्याची भिती)

सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलवा…

मॅथ्यूज नेदुमपरा यांनी मध्येच बोलण्यासाठी केलेल्या मागणीवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी हुडा यांच्यानंतर तुम्हाला बोलायची संधी देतो, असं सांगितलं. पण त्यावर मॅथ्यूज नेदुमपरा यांचं समाधान झालं नाही. त्यांनी उलट सरन्यायाधीशांनाच विरोध करत “मी इथे सर्वात ज्येष्ठ आहे, मला बोलायची संधी मिळायला हवी”, असं म्हणून वादाला सुरुवात केली.

वकील मॅथ्यूज नेदुमपरा यांचा वाद ऐकून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड चांगलेच भडकले. त्यांनी मॅथ्यूज नेदुमपरा (Mathews Nedumpara) यांना सुनावलं. “मी तुम्हाला ताकीद देतोय. तुम्ही हा असा संवाद करू शकत नाही. मी या कोर्टाचा इनचार्ज आहे”, असं सरन्यायाधीश म्हणाले. एवढंच नव्हे, तर त्यांनी थेट सुरक्षा अधिकाऱ्यांना आदेश दिले. “सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलवा आणि यांना बाहेर काढा”, असं सरन्यायाधीश म्हणाले.

होऊ शकते कारवाई

मॅथ्यूज नेदुमपरा यांनीही यानंतर बोलणे चालू ठेवले. ते म्हणाले, “मी जातोच आहे, मला अशा प्रकारे तुम्ही बाहेर काढण्याची आवश्यकता नाही.” त्यावर पुन्हा सरन्यायाधीश संतापले. “तुम्ही हे असं बोलण्याची गरज नाही. तुम्ही जाऊ शकता. मी गेल्या २४ वर्षांपासून न्यायव्यवस्था पाहतोय. मी अशा प्रकारे वकिलांना या कोर्टात कामकाज कसं व्हायला हवं हे ठरवू देऊ शकत नाही”, असं न्यायमूर्ती म्हणाले.

प्रत्युत्तर म्हणून पुन्हा मॅथ्यूज नेदुमपरा (Mathews Nedumpara) यांनी “मी १९७९ पासून न्यायप्रक्रिया पाहतोय”, असं म्हटलं. या घडामोडींनंतर मात्र सरन्यायाधीशांनी मॅथ्यूज नेदुमपरा यांना शेवटचा इशारा दिला. “मला कदाचित तुमच्याविरोधात असे काही आदेश द्यावे लागू शकतात, जे तुमच्यासाठी रास्त ठरणार नाहीत”, असं धनंजय चंद्रचूड (CJI Chandrachud) म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.