सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्या सेवानिवृत्तीनंतर देशाचे 51 वे सरन्यायमूर्ती न्या. संजीव खन्ना (CJI Sanjiv Khanna) यांचा कार्यकाळ अवघा 6 महिन्यांचा असणार आहे. आगामी 13 मे 2025 रोजी ते सरन्यायमूर्ती पदावरून सेवानिवृत्त होतील.
संजीव खन्ना यांचा वकिलीचा वारसा त्यांचे वडील देवराज खन्ना यांच्याकडून मिळाला. देवराज खन्ना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिले आहेत. तर संजीव खन्ना यांचे काका हंसराज खन्ना हे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सरन्यायमूर्ती होते. निवृत्त सरन्यायमूर्ती चंद्रचूड यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा होता. नवे सरन्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा कार्यकाळ केवळ 6 महिने असेल. आगामी 13 मे 2025 रोजी ते सरन्यायमूर्ती पदावरुन निवृत्त होतील. संजीव खन्ना यांनी 1983 मध्ये दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. पुढे न्यायमूर्ती खन्ना यांनी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयातून वकिलीला सुरूवात केली.
(हेही वाचा – बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करण्याचं धाडस आहे का?; PM Narendra Modi यांचे काँग्रेसला आव्हान)
त्यानंतर ते आयकर विभाग आणि दिल्ली सरकारच्या नागरी प्रकरणांचे वकीलही होते. संजीव खन्ना 2005 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. तब्बल 13 वर्षे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिल्यानंतर खन्ना यांना 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाली. त्यांच्या या नियुक्तीला त्या वेळी विरोधही झाला होता.सर्वोच्च न्यायालयातील 6 वर्षांच्या कारकिर्दीत न्यायमूर्ती खन्ना यांनी 400 पेक्षा अधिक न्यायपीठांचा भाग म्हणून काम केले. या वर्षी जुलैमध्ये न्यायमूर्ती खन्ना (CJI Sanjiv Khanna) आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने दिल्लीचे तत्कालिन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता.
अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचे समर्थनही त्यांनी केले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community