कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी व बारावी परीक्षेकरिता प्रविष्ट विद्यार्थ्यांना अनुक्रमे त्यांच्या सातवी व आठवी तसेच नववी व दहावीच्या क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्यात येणार आहेत प्रचलित पद्धतीनुसार बारावीची क्रीडा परीक्षा शिक्षण मंडळातर्फे २० फेब्रुवारी दरम्यान व दहावीची परीक्षा १ मार्च दरम्यान सुरू करण्यात येत होती. मात्र, यावर्षी कोरोना संसर्गामुळे या दोन्ही परीक्षा दोन आठवडे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च, तर दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणार आहे. यावर्षी ऑनलाईन-ऑफलाईनच्या घोळामुळे विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडाला आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होऊ नये, म्हणून वेगवेगळे उपाय केले जात आहे. विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने, लेखी परीक्षेत १०० गुणांसाठी ३० मिनिटे अधिक वेळ तसेच ४० ते ६० गुणांच्या पेपर साठी १५ मिनिटांचा अधिक वेळ देण्यात आला आहे.
दहावीच्या क्रीडा गुणांसाठी हे निकष?
इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थ्यांबाबत इयत्ता सातवी व आठवीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन त्यांना २०२१-२२ या वर्षाकरिता सवलतींचे क्रीडा गुण देण्यात यावेत. असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.
( हेही वाचा: मोठी बातमी! तपासयंत्रणेच्या रडारवर शिवसेनेचा आता ‘हा’ नेता )
‘ही’ सवलत यंदाच
दहावी व बारावीच्या विद्याथ्यांना क्रीडा गुणांसाठी त्यांच्या सातवी, आठवी, नववी व दहावीमधील क्रीडा स्पर्धेतील सहभागाचा विचार करून क्रीडा सवलतीचे गुण देण्याची ही सवलत केवळ २०२१-२२ या वर्षाकरताच राहणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण मिळेल. यासाठी त्यांच्या सातवी, आठवी, नववी, दहावी क्रीडा स्पर्धेतील सहभागाचा विचार करण्यात येणार आहे, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे म्हणाले.
Join Our WhatsApp Community