कोविड काळामध्ये अस्वच्छता करणाऱ्यांकडून दंडात्मक रकमेची वसुली करणाऱ्या क्लीन अप मार्शलची (Clean up Marshall) योजना बंद केल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छता राखण्याच्या दृष्टीकोनातून दंडात्मक कारवाई करण्यासाठी क्लीन अप मार्शल (Clean up Marshall) तैनात केले जाणार आहे. मात्र, आजवर पावती पुस्तकाद्वारे दंड आकारणाऱ्या या संस्थांच्या मार्शलकडून (Clean up Marshall) आता ऑनलाईन तथा डिजिटल दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे. अस्वच्छता करणाऱ्यांकडून ऑनलाईन दंडात्मक रक्कम वसूल करण्याबाबतचे नियोजन केले जात असून येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हे क्लीन अप मार्शल (Clean up Marshall) रस्त्यावर दंड वसूल करताना दिसणार आहे. (BMC)
रस्त्यावर थुंकणे, उघड्यावर कचरा टाकणे किंवा अस्वच्छता करणे आदी गैर वर्तनाबद्दल दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेच्यावतीने क्लीन अप मार्शलची (Clean up Marshall) नेमणूक करण्यात आली होती. परंतु कोविड काळातही हा दंड वसूल करत संस्थांचे खिसे भरले जात असल्याचा आरोप झाल्याने या संस्थांचे करार संपुष्टात आणत ही योजना बंद केली होती. परंतु आता मुंबई सुशोभीकरणाअंतर्गत पूर्ण स्वच्छता मोहिम महापालिकेच्यावतीने राबवण्यात येत आहे. तसेच वाढत्या हवेतील प्रदुषणाबाबत बनवलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अशाप्रकारे क्लीन अप मार्शलची (Clean up Marshall) उणीव भासू लागली आहे. (BMC)
(हेही वाचा – MNS : लोकशाहीची हत्या तेव्हाही झाली होती, मनसेने करून दिली आठवण)
प्रत्येक मार्शलच्या चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी
त्यामुळे या अंतर्गत मुंबईत अस्वच्छता करणाऱ्यांना शिस्त लागावी याकरता दंड आकारण्यासाठी पुन्हा एकदा क्लीन अप मार्शलना (Clean up Marshall) नियुक्त करण्याचा निर्णय घेत संस्थांच्या नेमणुकीसाठी निविदा मागवली होती. ही निविदा अंतिम होत याला मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये संस्थांकडून नियुक्त होणाऱ्या प्रत्येक मार्शलच्या चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी केली जाणार आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यांनतर संस्थांच्यावतीने मार्शलची नियुक्ती केली जाईल आणि अस्वच्छता करणाऱ्यांवर दंड आकारतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही प्रक्रिया या महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होऊन फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मार्शलच्या (Clean up Marshall) अंमलबजावणीला सुरुवात होईल, असे बोलले जात आहे. (BMC)
प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत ३० याप्रमाणे २४ विभाग कार्यालयांमध्ये क्लीन अप मार्शल नियुक्त केले जातील असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेने सन २००६मध्ये प्रथम क्लीन अप मार्शल योजना (Clean up Marshall) सुरु केली होती, त्यानंतर पुन्हा जुलै २०१६मध्ये पुन्हा सुरु केली होती. त्यानंतर कोविड काळात सर्वच पातळीवरून आरोप झाल्याने सन २०२२मध्ये ही योजना बंद करण्यात आली होती. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community